शेतकरी समर्थकांना NIA कडून समन्स; बादल म्हणाले, हेतूपुर्वक त्रास देतंय सरकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

शेतकरी नेत्यांना तसेच आंदोलनाच्या समर्थकांना NIA कडून समन्स पाठवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने शेतकरी नेता बलदेव सिंह सिरसा आणि पंजाबी ऍक्टर दीप सिद्धू यांच्यासहित 40 जणांना समन्स पाठवून आज रविवारी चौकशीसाठी बोलावलं गेलं आहे. अकाली दलचे नेता सुखबीर सिंह बादल यांनी केंद्र सरकारच्या एजन्सीद्वारे केल्या गेलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच असा आरोप लावलाय की, केंद्र सरकार चर्चेची नववी फेरी अयशस्वी झाल्यानंतर शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांना त्रास देऊ इच्छित आहे. 

बादल यांनी शनिवारी ट्विट केलं की, शेतकरी नेते आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांना NIA आणि ED द्वारे चौकशी  करण्यासाठी बोलावून त्यांना धमकावण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांची निषेध करतो. ते देशद्रोही नाही आहेत. चर्चेची नववी फेरी अयशस्वी झाल्यानंतर, हे अगदी स्पष्ट झालं आहे की, भारत सरकार केवळ शेतकऱ्यांना थकवण्याच्या प्रयत्नात आहे. 

हेही वाचा - VIDEO : 'अल्लाहू अकबर' म्हणत सामान सोडून पळू लागला; एअरपोर्ट केलं रिकामं

राष्ट्रीय तपास संस्थेने बंदी घालण्यात आलेल्या शीख फॉर जस्टीसशी संबंधित एका प्रकरणामध्ये IPC च्या कलम 160 अंतर्गत साक्ष तपासणीसाठी जवळपास 40 लोकांना बोलावलं आहे. ऍक्टर दीप सिद्धू शेतकरी आंदोलनाचे समर्थन तसेच तीन कृषी कायद्यांचा विरोध करत होते. त्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं गेलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akali dal leader sukhbir singh badal slams centre alleged for attempting intimidate farmer leaders