esakal | सुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant_Neeraj

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

सुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Bihar Cabinet Expansion: पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. यावेळी १७ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यापैकी ९ जण भारतीय जनता पक्षाचे तर ८ जण जनता दल युनायटेडचे आहेत. विशेष म्हणजे भाजपकडून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा भाऊ नीरज सिंह बबलू यांना मंत्रीपद बहाल करण्यात आलं आहे. नीरज सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. पटना येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यावेळी त्यांनी राजस्थानी पगडी बांधत मंत्रिपदाची शपथ घेतली. 

VIDEO - प्रशिक्षित श्वान शोधणार कोरोनाचे रुग्ण; लष्कराने घेतली चाचणी

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. हुसैन यांच्यासह नितीन नवीन, नीरज कुमार बबलू, सम्राट चौधरी, सुभाष सिंह, आलोक रंजन झा, प्रमोद कुमार, जनक राम आणि नारायण प्रसाद हे मंत्री बनले आहेत. तर जेडीयूच्या कोट्यातून लेसी सिंह, जमा खान, जयंत राज, मदन सहनी, श्रवण कुमार, संजय झा आणि सुनील कुमार हे मंत्री बनले आहेत. तसेच अपक्ष उमेदवार सुमीत सिंह यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. 

Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड​

कोण आहेत नीरज सिंह बबलू
दिवंगत अभिनेता सुशांत सिंहचे चुलत बंधू असलेले नीरज सिंह बबलू हे बिहारच्या छातापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांच्या परिवाराला आधार देणाऱ्या काही प्रमुख व्यक्तींपैकी ते एक आहेत. सुशांतची हत्या करण्यात आल्याचा आरोपही नीरज यांनी केला होता. तसेच त्यांनी सुशांतच्या बहिणींना सोबत घेत जस्टिस फॉर एसएसआर ही मोहीम चालवली होती. 

ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा

दरम्यान, २००५ मध्ये राजकारणात पाऊल टाकलेल्या नीरज सिंह बबलू यांनी राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यानंतर त्यांनी २०१०, २०१५ आणि २०२० मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. सलग चारवेळा आमदार बनलेले नीरज यांचा भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये समावेश होतो. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image