कायदा पुरूषांविरुद्ध पक्षपाती; लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

allahabad high court
allahabad high courtesakal

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सिद्धार्थ यांच्या खंडपीठाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देताना विवेक कुमार मौर्य यांना कलम ३६३, ३६६, ३७६, ३२३, ५०४, ५०६, ३५४, ३५४-अ आयपीसी आणि ३/४ पॉक्सो कायद्यांतर्गत जामीन दिला. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अपहरण, बलात्कार आणि विविध लैंगिक गुन्ह्यांचा समावेश आहे.यावेळी अलाहबाद उच्च न्यायालयाने आज महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

लैगिक गुन्ह्यांची खरी प्रकरणे आता अपवाद आहेत. यामध्ये प्रामुख्याने बलात्काराच्या खोट्या आरोपांचा समावेश आहे. आरोपींसोबत दिर्घकाळ शारीरीक संबंध ठेवल्यानंतर मुली आणि स्त्रिया चुकीच्या पद्धतीने एफआयआर नोंदवतात, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, "न्यायालयात मोठ्या प्रमाणात प्रकरणे येत आहेत ज्यात मुली आणि महिला आरोपींसोबत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवल्यानंतर खोट्या आरोपांवर प्रथम माहिती अहवाल दाखल करून अयोग्य फायदा घेतात."

“अशा जामीन अर्जांचा विचार करताना न्यायालयांनी अत्यंत सावध राहण्याची वेळ आली आहे. कायदा पुरूषांच्या बाबतीत खूप पक्षपाती आहे. एफआयआरमध्ये कोणतेही बिनबुडाचे आरोप करणे आणि सध्याच्या प्रकरणाप्रमाणे कोणालाही अशा आरोपांमध्ये अडकवणे खूप सोपे आहे", असे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी म्हटले आहे.

न्यायमूर्ती सिद्धार्थ पुढे म्हणाले, “सोशल मीडिया, चित्रपट, टीव्ही शो इत्यादींद्वारे पसरवल्या जाणार्‍या मोकळेपणाच्या संस्कृतीचे अनुकरण किशोरवयीन आणि तरुण मुले-मुली करत आहेत. जेव्हा त्यांचे वर्तन भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक नियमांशी संघर्ष करते आणि मुलीच्या कुटुंबाच्या सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा अशा दुर्भावनापूर्ण खोट्या एफआयआर दाखल केल्या जातात.

"काही वेळ दीर्घ काळ लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, कोणत्याही मुद्द्यावर मुलगा आणि मुलगी यांच्यात वाद होतात तेव्हा अशा प्रकारचे एफआयआर नोंदवले जातात. अशा प्रकरणात जोडीदाराचा स्वभाव वेळोवेळी बदलतो, मग त्यांना कळते की त्यांचे नाते आयुष्यभर टिकू शकत नाही, मग ते तक्रार दाखल करतात, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने असेही म्हटले आहे की, संरक्षण कायद्यात मुली/महिलांचा वरचष्मा असल्याने, सध्याच्या प्रकरणांसारख्या प्रकरणात महिला सहजपणे मुलगा किंवा पुरुषाला गोवण्यात यशस्वी होतात. (Latest Marathi News)

allahabad high court
मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष

केस काय होती?

तक्रारदाराच्या वकिलांनी आरोप केला की, आरोपीने अल्पवयीन मुलीशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर केवळ लैंगिक आनंदासाठी तिच्याशी लग्न केले. आरोपीने मुलीला त्याच्या चुलत भावासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि तिने विरोध केला असता आरोपी-अर्जदार व त्याच्या चुलत भावाने तिला शिवीगाळ व मारहाण केली.

तर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, पीडित मुलगी मेजर असून तिचे अर्जदाराशी गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. ती स्वेच्छेने तिचे घर सोडून अर्जदाराच्या मावशीच्या घरी गेली आणि तिने अर्जदाराशी संमतीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाले आणि त्यांनी (महीला) एफआयआर दाखल केला.

अर्जदाराला जामीन मंजूर करताना, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की खोटे आरोप आणि चुकीच्या तथ्यांच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि अर्जदार (आरोपी जामीनासाठी अर्ज) यांच्यातील विवाह अधिकृतपणे नोंदणीकृत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. तसेच कोर्टामार्फत घटस्फोट, विवाह विघटन किंवा न्यायालयीन ते विभक्त झाले नव्हते.

allahabad high court
Nuh Violence : देशातील वाढत्या हिंसेवरून सर्वोच्च न्यायालयानेच खडसावले; म्हटलं, हेट स्पीच...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com