प्रेमासाठी धर्म बदलला! पत्नीच्या नावे 3 लाखांची FD काढ; पतीला कोर्टाचा आदेश

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

धर्म बदलून मुस्लीम तरुणाशी विवाह केल्यानंतर सुरक्षा मिळावी यासाठी बिजनोरी येथील शाइस्ता उर्फ संगीता बिजनौर हिने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना कोर्टाने यासंदर्भातील आदेश दिले.

प्रयागराज : लव्ह जिहादशी (Love Jihad) संबंधित प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) मोठा निर्णय दिला आहे. मुस्लीम तरुणाशी विवाह करण्यासाठी धर्म बदललेल्या तरुणीला 3 लाख रुपये आर्थिक सुरक्षा द्यावी, असा आदेश कोर्टाने दिलाय. संबधीत तरुणीचा पती सादाब अहमदला एका महिन्यात तरुणीच्या नावे 3 लाखांची मुदत ठेव (fixed deposit) पावती बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

तरुणीला मेहर स्वरुपात मिळणारी रक्कम अधिक कमी असल्यामुळे कोर्टाने हा निकाल दिलाय. पतीसाठी धर्म परिवर्तन करुन कुटुंबियांना दुखावल्यानंतर पत्नीला आर्थिक सुरक्षितता मिळायला हवी, असा उल्लेखही कोर्टाने निकाल सुनावताना केला. 8 फेब्रुवारीपर्यंत एफडी करुन त्याची ओरिजनल कॉपी कोर्टात द्यावी, असे न्यायाधीश सलिल श्रीवास्तव यांच्या पीठाने म्हटले आहे. 

गाडीमालकाच्या बायकोसोबत बदमाशांचा पोबारा; किल्ली सोडून गेल्याचा चोरांनी घेतला फायदा

धर्म बदलून मुस्लीम तरुणाशी विवाह केल्यानंतर सुरक्षा मिळावी यासाठी बिजनोरी येथील शाइस्ता उर्फ संगीता बिजनौर हिने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना कोर्टाने यासंदर्भातील आदेश दिले. मुस्लिम तरुणाशी विवाह करण्यासाठी संगीताने आपला धर्म बदलून शाइस्ता परवीन नाव केले. तिच्या कुटुंबिय या प्रकारावर नाराज होते. कुटुंबियांनी मारहाण केल्यानंतर संगीताने कोर्टात सुरक्षा मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. 

हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

सामाजिक नाते तोडा पण मारहाण किंवा धमकी देऊ नका 

कोर्टाने बिजनौरच्या पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच सुरक्षा आणि एफडीसंदर्भात कोर्टाने महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. संबंधीत तरुणी सज्ञान असून तिने इच्छेनुसार आपला जोडीदार निवडला आहे. परंपरेचा दाखला देऊन तिला कुटुंबियांनी त्रास देणे किंवा धमकावण्याचा अधिकार नाही. इच्छेनुसार तिला आवडत्या तरुणासोबत राहण्याचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allahabad high court orders protection to interfaith couple