गाडीमालकाच्या बायकोसोबत बदमाशांचा पोबारा; किल्ली सोडून गेल्याचा चोरांनी घेतला फायदा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

बदमाश चोरांनी टाटा टियागो गाडीच्या आत थांबलेल्या गाडीच्या मालकाच्या पत्नीसमवेत पळ काढला आहे.

चंदीगढ : पंजाबच्या डेरा बस्सी येथे विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. दोन बदमाशांनी एका व्यक्तीची गाडी चोरली आहे. पण इथंवरच ही घटना मर्यादीत नाहीये तर या बदमाश चोरांनी टाटा टियागो गाडीच्या आत थांबलेल्या गाडीच्या मालकाच्या पत्नीसमवेत पळ काढला आहे. ही घटना गुरुवारी डेरा बस्सीमधील सुखमनी शाळेजवळ घडली आहे. 

या गाडीच्या मालकाने गाडीची चावी गाडीलाच लावलेली होती. तसेच गाडीमध्ये त्याची पत्नी देखील बसलेली होती. गुरुवारी गाडीमालक राजीव चांद आणि त्यांची पत्नी रितू हे दोघे शाळेमध्ये आपल्या मुलांची शाळेची फी भरण्यासाठी आले  होते. गुरुवारी साधारण दुपारी एक वाजता राजीव गाडीची किल्ली गाडीलाच लावून आत शाळेमध्ये गेले. त्यांची पत्नी रितू या गाडीमध्येच त्यांची वाट पाहत थांबल्या होत्या. जेंव्हा त्या दोन चोरांनी गाडीचा दरवाजा उघडून त्यात बसून पोबारा केला तेंव्हा ही गाडी चंदीगढ-अंबाला हायवेवर पार्क केली होती.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

त्यातील एक ड्रायव्हरच्या सीटवर बसला तर दुसरा रितू यांच्याजवळ बसला. त्याने रितू यांचे तोंड जबरदस्ती बंद केले. रितू यांचे तोंड दाबून त्याच परिस्थितीत गाडी चोरून पोबारा केल्यानंतर साधारण पाच किलोमीटरनंतर त्यांनी गाडी थांबवली. अंबाला टोल नाक्याजवळ त्यांनी रितू यांना उतरवलं आणि ते डेरा बस्सीच्या दिशेने फरार झाले. त्यानंतर रितू यांनी आपल्या पतीला तातडीने फोन करुन घडेलेली हकिकत सांगितली.

अनोळखी चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटलंय की, टोल नाक्याजवळच्या सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून या चोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: carjackers drive off with wife when Man leaves keys inside car in Punjab's Dera Bassi

Tags
टॉपिकस
Topic Tags: