संबंध न ठेवल्याने महिलेने केले भांडण; रागाच्या भरात केला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women quarreled over not having physical relationship

शारीरिक संबंध न ठेवल्याने महिलेने केले भांडण; रागाच्या भरात केला खून

गाझियाबादनगर बाजारिया येथील आर्यदीप हॉटेलमध्ये ४ मे रोजी रात्री महिलेची हत्या (Murder) करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि सफाई कामगाराला अटक केली आहे. इसमाने शारीरिक संबंध (physical relationship) न ठेवल्याने महिला चिडली होती. यामुळे त्याने महिलेची हत्या करून पळ काढला होता. प्रियांका (४८) असे मृताचे तर नौशाद खान पठाण ऊर्फ ​​अच्छे असे आरोपीचे नाव आहे. (Women quarreled over not having physical relationship)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका ही मूळची अलिगडची रहिवासी आहे. गाझियाबादच्या लालकुआन भागात पतीपासून चार वर्षांपासून वेगळी राहत होती. ४ मे रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ती एका व्यक्तीसोबत बजारिया येथील आर्यदीप हॉटेलमध्ये आली. दुपारी २.३० वाजता तिच्यासोबत असलेला व्यक्ती हॉटेलमधून पळून गेला.

५ मे रोजी हॉटेल व्यवस्थापक विजय यादव यांनी पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. हॉटेलचे रजिस्टर तपासल्यावर प्रियांकासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव सतीश असे लिहिले होते. मात्र, त्याची पडताळणी होऊ शकली नाही. पोलिसांनी मृताच्या पतीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला.

या प्रकरणी पोलिसांनी नौशाद खान पठाण ऊर्फ ​​अच्छे याला अटक केली. ४ मे रोजी कामानिमित्त रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. तिथे प्रियांकाशी भेट झाली. काही वेळ बोलल्यानंतर आमची मैत्री झाली. त्यानंतर आम्ही रात्री उशिरा हॉटेल आर्यदीपमध्ये गेलो. मी प्रियांकाशी शारीरिक संबंध ठेवले (physical relationship) नाही. त्यामुळे प्रियांका भांडू लागली. याच कारणाने प्रियांकाचा गळा आवळून खून (Murder) केला आणि दोन्ही मोबाईल घेऊन पळ काढला, असे चौकशीत नौशादने सांगितल्याचे एसपी सिटी निपुण अग्रवाल यांनी सांगितले.

हॉटेल व्यवस्थापनाने केली दिशाभूल

हॉटेलमधून बाहेर पडताना नौशादने हॉटेल मालक रवींद्र यादव, व्यवस्थापक विजय यादव आणि नोकर अच्छे लाल यांना घटनेची माहिती दिली. असे असतानाही दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. व्यवस्थापकाने नौशादचा आयडी न घेता नाव सतीश असे रजिस्टरमध्ये टाकले. त्याचा मोबाईल क्रमांकही चुकीचा लिहिला होता. हॉटेलच्या रजिस्टरमधील अनेक पुरावे खोडण्याचे प्रयत्न करण्यात आले.