esakal | 'तबलिगी जमात'मध्ये आले होते ४१ देशांचे नागरिक; ९६० जणांची यादी जाहीर!
sakal

बोलून बातमी शोधा

Tablighi-Jamaat

या कार्यक्रमात ९००० हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. त्यापैकी काही जणांनी धर्मप्रचारासाठी देशाच्या विविध भागांना भेटी दिल्या.

'तबलिगी जमात'मध्ये आले होते ४१ देशांचे नागरिक; ९६० जणांची यादी जाहीर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट बनवलं ते निजामुद्दीन येथील मरकजमध्ये आयोजित केलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने. देशातच कोरोनाच्या केसेस या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमानंतर वाढलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे याविषयी आणखी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारच्या हाती लागली आहे. आणि ही माहिती ऐकल्यानंतरही सर्वांचे डोळे विस्फारतील. कारण या कार्यक्रमात जगभरातील ४१ देशांचे नागरिक सहभागी झाले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातलेल्या फ्रान्स आणि इरान या देशांचे नागरिकही यामध्ये सामील झाले होते. कोरोनाच्या संकटात भर टाकणाऱ्या या कृतीबद्दल केंद्र सरकारने जमातविरोधात कठोर कारवाई केली आहे. देशभरात फिरत असलेल्या तबलिगी जमातच्या ९६० परदेशी सदस्यांच्या नावांची यादी (ब्लॅक लिस्ट) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ४ अमेरिकी, ९ ब्रिटीश आणि ६ चिनी नागरिकांचा समावेश आहे. 

जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शेकडो लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्वात जास्त इंडोनेशियन लोक सहभागी झाले होते. सरकारने जाहीर केलेल्या यादीत इंडोनेशियाचे एकूण ३७९ नागरिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. 

- Coronavirus : आता पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन; ५ एप्रिलला...

ब्लॅक लिस्टमधील ९६० परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. हे सर्व परदेशी नागरिक देशाच्या विविध भागात विखुरले गेले आहेत. ब्लॅक लिस्टमधील ९६० परदेशी नागरिकांमध्ये इंडोनेशियाचे ३७९, बांगलादेशचे ११०, म्यानमारचे ६३, श्रीलंकेचे ३३, किर्गीस्तानचे ७७, मलेशियाचे ७५, थायलंडचे ६५, व्हिएतनामचे १२, सौदी अरेबियाचे ९ तर फ्रान्सचे ३ नागरिक आहेत. या सर्वांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. 

- क्वारंटाइन कक्षातच सामूहिक नमाज पठण; पाहा कोठे काय घडले!

२१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही २५० च्या आसपास परदेशी नागरिक निजामुद्दीनमधील इस्लामी संघटनेच्या मुख्यालयात थांबले होते. त्यावेळी याच ठिकाणी तबलिगी जमातीचे २३०० कार्यकर्तेही याच ठिकाणी वास्तव्याला होते. तबलिगी जमातीचे ३०० हून अधिक नागरिक कोरोनाग्रस्त असल्याचे आतापर्यंत पुढे आलेल्या केसेसमध्ये आढळून आले आहे. बाकी संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.  

- Coronavirus : जागतिक बँक भारताच्या मदतीला; सर्वाधिक निधीची तरतूद

दरम्यान, दिल्लीच्या निजामुद्दीन भागात असलेल्या मरकजमध्ये गेल्या महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ९००० हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. त्यापैकी काही जणांनी धर्मप्रचारासाठी देशाच्या विविध भागांना भेटी दिल्या. सध्या देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. तर निजामुद्दीनच्या मरकजमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या १२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

loading image