चेन्नई: एका युवकाने गाण्यांवर केलेल्या हावभावाचे व्हिडिओ टीकटॉवर व्हायरल होत असून, याला शंभर तोफांची सलामी द्यायला हवी, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.
अलुगोलू प्रकाश (@alugoluprakash) असे या टिक टॉक स्टारचे नाव आहे. या व्हिडिओमध्ये तो डोळे, हात, गळा, भुवया आणि ओठ हलवून वेगवेगळ्या पद्धतीचे गाण्यावर, किंवा संगीतावर हावभाव करताना दिसत आहे. संगीत ऐकून चेहऱ्याच्या त्या बिट्स नुसार हावभाव करणे कठीण आहे. पण, या युवकाने ते उत्तम रित्या साकारले आहे. सोशल मीडियावर या युवकाच्या कलेची तुफान चर्चा आहे. युवकाचे हावभाव थक्क करणारे असून, नेटिझन्सनी त्याचे कौतुक केले आहे. संबंधित व्हिडिओला जवळपास 30 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
@alugoluprakash ##new_trending ##viralvideo ##foryoupage ##tiktokindia my trending face dancing supporting me all my friends
♬ DOODH KA KARZ - Samier Khan
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.