
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. याआधी अमरनाथ यात्रा दहा दिवसांसाठी सुरू कऱण्याच निर्णय घेण्यात आला. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सध्याची परिस्थिती पाहता अखेर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लष्करानेही याबाबत माहिती दिली होती की, यंदाच्या अमरनाथ यात्रा होण्याबाबत शंका आहे.
आतापर्यंत अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, अमरनाथ यात्रा 21 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्यात येईल. दरम्यान, शुक्रवारी यात्रेसाठी प्रथम पूजेचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र अचानक अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यात्रा रद्द कऱण्याची घोषणा केली आहे. अमरनाथ यात्रा दरवर्षी जून महिन्यात सुरू होते.
अमरनाथ यात्रा रद्द झाली असली तरी बाबा बर्फानी गुहेत सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सर्व पुजा अर्चेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या आरतीचे लाइव्ह टेलिकास्ट करून भाविकांना व्हर्च्युअल दर्शन घेता येईल असंही बोर्डाकडून सांगण्यात आले.
याआधी एप्रिल महिन्यात बोर्डाने अमरनाथ यात्रा रद्द कऱणार असल्याचं म्हटलं होतं. याबाबत प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलं होतं. मात्र यानंतर जम्मू काश्मीरच्या माहिती संचालनालयाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून अमरनाथ यात्रा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
अमरनाथ यात्रेसाठी दर वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून रजिस्ट्रेशन सुरु केले जाते. यावर्षी कोरोनामुळे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु झाली नव्हती. 20 वर्षांपूर्वी अमरनाथ श्राईन बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. याचे अध्यक्ष जम्मू काश्मीरचे राज्यपाल किंवा उपराज्यपाल असतात.
गेल्या वर्षीसुद्धा अमरनाथ यात्रेत अडथळा आला होता. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर अमरनाथ यात्रा मधेच थांबवावी लागली होती. तोपर्यंत जवळपास 3.50 लाख यात्रेकरूंनी बर्फानी बाबांचे दर्शन घेतले होते. दरवर्षी भारतासह जगभरातून भाविक अमरनाथ यात्रेसाठी येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.