Amazon Jobs : भारतीयांना अ‍ॅमेझॉनचा मोठा धक्का! शेकडो लोक होणार बेरोजगार...

पुढील काही महिन्यात अ‍ॅमेझॉन भारतातल्या शेकडो लोकांना कामावरून काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Amazon Jobs
Amazon Jobsesakal

Amazon Layoffs : सध्या आलेल्या आर्थिक मंदीमुळे बऱ्याच मोठमोठया कंपन्या कर्मचारी कमी करत आहेत. आता यात अ‍ॅमेझॉन कंपनीचीपण भर पडली आहे. पुढील काही महिन्यात अ‍ॅमेझॉन भारतातल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी बरेच ऑपरेशन्स कमी करणार आहेत. Jobs Cut च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये हे समोर आलं आहे.

Amazon Layoff ची घोषणा पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही ई कॉमर्स कंपनी देशातले आपले बरेच प्रकल्प कमी करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शेकडो भारतीयांना बेरोजगाराला सामोरं जावं लागणार आहे. काय आहे लेटेस्ट रिपोर्ट आणि कोण कोणते प्रकल्प बंद होऊ शकतात जाणून घ्या.

Amazon Jobs
Amazon ची ‘ही’ सेवा भारतात होणार बंद; वाचा काय आहे कारण?

कोणते व्यवसाय बंद होणार?

अ‍ॅमेझॉन इंडियामधला फक्त डिलीव्हरी करण्याचा, लघु व्यावसायिकांमा पॅक्ड कंझ्युमर गुड्य डोअरस्टेप डिलीव्हरी करण्याचा व्यवसाय बंद करण्याची योजना आहे. हे दोन्ही पुढील महिन्यात बंद होण्याची शक्यता आहे. याच्याशी संबंधीत शेकडो लोकांची नोकरी जाईल.

Amazon Jobs
Amazon Sale: 'या' डिव्हाइसवर मिळतेय भरघोस सूट, सुरुवाती किंमत फक्त ५९९ रुपये; पाहा लिस्ट

अ‍ॅमेझॉन अ‍ॅकेडमी बंद, बीटा टेस्टिंग पोस्टपोन

रिपोर्टनुसार भारतात जेईई आणि नीट परिक्षा तयारीसाठी असणारं ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन अ‍ॅकेडमी बंद करण्यात येणार आहे. पण याला थोडा वेळ लागणार आहे. याशिवाय बीटा टेस्टिंग प्रोजेक्ट पण काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

Amazon Jobs
Amazon Layoffs : कंपनीच्या उलट्या बोंबा! "कामावरुन काढले नाही, कर्मचाऱ्यांनी स्वत:च दिला राजीनामा"

मागेच अ‍ॅमेझॉनने हे जाहीर केलं होतं की, ते १० हजार कर्मचारी कमी करणार आहेत, पण हे कर्मचाकी एकदम न काढता थोडे थोडे काढले जातील. पण आतापर्यंत कंपनीने कोणालाही काढलेलं नसल्यचं समजतं आहे. पण कर्मचाऱ्यांना स्वतः राजीनामा देण्यास सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com