रुग्णवाहिकेचा चालक अपघातानंतर पळाला पण...

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

एक रुग्णवाहिका वेगाने जात असताना समोरून आलेल्या दुचाकीसोबत जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे.

जयपूर (राजस्थान): एक रुग्णवाहिका वेगाने जात असताना समोरून आलेल्या दुचाकीसोबत जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Video: बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होताच जोरदार राडा

जयपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 वरील नेलापूरजवळ हा अपघात घडला. सध्या या मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून, एका बाजूची वाहतूक बंद आहे. रुग्णवाहिका आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पण, दुर्घटना घडलेल्या रुग्णावाहिकेत एकही रुग्ण नव्हता. अपघातानंतर रुग्णावाहिकेचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

साप, युवक आणि अजगराचा धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या तिघांना शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठवले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा तत्परतेने काम करत आहे. रुग्णवाहिका सतत धावताना दिसत असून, रुग्णांना आणण्याचे व सोडण्याचे काम करताना पाहायला मिळतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambulance and two wheeler accident near jaipur rajasthan