esakal | कोरोनाबाबत अमित शहांचा विरोधकांनाच सवाल; सोशल मीडियावर झाले ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah In BJP Virtual Rally

कोरोनाशी लढताना आणि प्रवासी मजुरांबाबत आमच्याकडून चुका झाल्या असतील पण तुम्ही काय केलंत असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना विचारला आहे.

कोरोनाबाबत अमित शहांचा विरोधकांनाच सवाल; सोशल मीडियावर झाले ट्रोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 09 : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. केंद्र सरकारने कोरोना व्हायरसविरोधात प्रभावी पावलं उचलली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहा यांनी ओडिशामध्ये एका व्हर्च्युअल रॅलीमध्ये मार्गदर्शन करताना विरोधकांनाच सवाल केला आहे. त्यांच्या या सवालावरून सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे. अमित शहा व्हर्च्युअल सभेमध्ये म्हणाले की, कोरोना व्हायरसशी लढण्यामध्ये आणि प्रवासी मजुरांच्या बाबतीत आमच्याकडून चूक झाली असेल. काही त्रुटी राहिल्या असतील पण आम्ही प्राणाणिकपणे काम केलं.

अमित शहा म्हणाले की, कोरोनाशी लढताना आम्ही काही ठिकाणी कमी पड़लो असेल. काही करता आलं नसेल. पण तुम्ही काय केलं असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे. केंद्र सरकारने 60 कोटी लोकांसाठी एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज दिलं आहे. विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत. पण मी त्यांना विचारतो की त्यांनी काय केलं? 

कोरोनावरील उपचाराची नवी उमेद; भारतात सुरु झाला हा प्रयोग

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन कऱण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी ऑनलाइन चर्चा केली होती. त्यावरूनही अमित शहा यांनी निशाणा साधला. अमित शहा म्हणाले की, कोणी स्वीडनमध्ये, कोणी अमेरिकेतील लोकाशी बोलतात. याशिवाय इतर काय केलंत तुम्ही? आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय मुलाखतींशिवाय काँग्रेस पक्षाने काही दिलं नाही असंही अमित शहा यांनी यावेळी म्हटलं. 

भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सरकार कोरोना व्हायरसविरुद्ध लढत आहे आणि लोकही सावध आहेत. जेव्हा कोरोनाच्या साथीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात जनता कर्फ्युचा उल्लेख सुवर्णाक्षरात केला जाईल असंही अमित शहा म्हणाले.

सॅटेलाइट फोटोंमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर, चीनमध्ये काय घडलं?

दरम्यान, अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅलीवरून आणि त्यांच्या वक्तव्यांवरून ट्रोल केलं जात आहे. एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गृहमंत्री मात्र निवडणुकांची तयारी करण्यात गुंग झाले असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. तसंच सरकारच्या कामावर प्रश्न विचारण्याचं काम विरोधकांचं असतं इथं सरकारकडून विरोधकांनाच काय केलंत असा सवाल विचारला जात असल्याचंही म्हटलं आहे.