Amit Shah criticizes Mamata Banerjee : "मोमो फॅक्ट्रीत कोणाचे पैसे जमा होते?" ; अमित शहांचा ममता बॅनर्जींना खडा सवाल!

Amit Shah Attacks Mamata Banerjee Over Fire Safety Lapses : उत्तर २४ परगणा येथील भाजप कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करताना अमित शहा यांनी प्रश्न उपस्थित केला की,
Amit Shah Attacks Mamata Banerjee

Amit Shah Attacks Mamata Banerjee

esakal

Updated on

Amit Shah Attacks Mamata Banerjee Over Fire Safety Lapses : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.  कोलकाताजवळील आनंदपूर मोमो फॅक्ट्रीच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेवरून प्रशासकीय निष्काळजीपणाचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 भाजप कार्यकर्ता संमेलनात गर्दीला संबोधित करताना शहा यांनी सर्वप्रथम आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर उत्तर २४ परगणा येथील भाजप कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करताना अमित शहा यांनी प्रश्न उपस्थित केला की, मोमो कारखान्यात कोणाचे पैसे साठवले गेले होते आणि कारखाना मालक कोणाबरोबर परदेशात गेला होता? शिवाय, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.

अमित शहा म्हणाले, "आनंदपूरची ही आग ही केवळ एक अपघात नाही तर ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचाराचे उघड प्रदर्शन आहे. मोमो कारखान्यात कोणाचे पैसे साठवले गेले होते? कारखाना मालक कोणाबरोबर परदेशात गेला होता? मालकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही?"

Amit Shah Attacks Mamata Banerjee
Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

तसेच शहा यांनी या घटनेवर राज्य सरकारच्या प्रतिसादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कामगारांच्या आक्रोशाच्या ३२ तासांनंतरही सरकार गप्प असल्याचे त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले. ते म्हणाले, "२५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि २७ अजूनही बेपत्ता आहेत. हे भारतीय नागरिक होते, परंतु मुख्यमंत्री ३२ तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्या. हे लज्जास्पद आहे."

Amit Shah Attacks Mamata Banerjee
Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहा म्हणाले की, "वंदे मातरम" या गाण्याचे जन्मस्थान असलेल्या बंगालमध्ये "वंदे मातरम" या ओळखीवर हल्ला होत आहे. तसेच शहा यांनी प्रश्न केला की, "वंदे मातरमच्या १५० व्या वर्षात, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत त्याचा विरोध केला. ममता बॅनर्जी मतपेढीच्या राजकारणासाठी बंगालच्या ओळखीच्या विरोधात उभ्या आहेत. बंगालचे लोक हे सहन करतील का?" असा सवालही केला.

Amit Shah Attacks Mamata Banerjee
Virat Kohli Instagram account is active ‘किंग कोहली इस बॅक ऑन इन्स्टा’ ! लाखो फॉलोअर्सचा जीव भांड्यात पडला; जाणून घ्या, नेमकं काय झालं होतं?

याचबरोबर बेकायदेशीर घुसखोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना अमित शहा यांनी याला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले. सीमा सुरक्षा दलाला सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारने सहकार्य केले नाही, या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने सहकार्य करो अथवा ना करो, मात्र भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर ३५ दिवसांच्या आत सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com