दहशवादी कारवाया का वाढल्या? अमित शहांचा सुरक्षा यंत्रणांना सवाल

कलम ३७० रद्द झाल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहे.
Amit-Shah
Amit-ShahTeam eSakal
Updated on

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झालीये. याच पार्श्वभुमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी नागरीकांच्या हत्या आणि दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. श्रीनगरमध्ये शाह यांनी सुरक्षा दलांना नागरिकांच्या हत्या का होत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. तसेच राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवादी कारवाया का वाढत आहेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना शक्य तेवढ्या लवकर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सांगितले. तसेच कट्टरपंथीयांवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करण्याचे पोलिसांना आवाहन केले.

Amit-Shah
भगसिंगांची पुस्तकं सापडल्याने ठरवले होते 'नक्षलवादी'; नऊ वर्षांनी निर्दोष मुक्त

लोकांनी कर्फ्यू, इंटरनेट बंद ठेवण्यावर प्रश्न उपस्थित केले. कर्फ्यू नसता तर माहीत नाही किती जीव गेले असते. कर्फ्यू, इंटरनेट बंद असल्याने काश्मीर तरुण वाचला असं यावेळी अमित शहांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com