
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बांगलादेशच्या निर्मितीत भारताचं ऐतिहासिक योगदान होतं याची आठवण करून दिली. दररोज नव्या कुरापती करणाऱ्या बांगलादेशला अमित शहा यांनी यातून इशाराच दिलाय. बांगलादेशनं विसरू नये की त्यांचा जन्म कसा झाला. त्यांच्या निर्मितीत भारताच्या सीमा सुरक्षा दलाची भूमिका काय होती हे लक्षात ठेवावं असंही अमित शहा म्हणाले. शेजारी देशाने १९७१ च्या मुक्ति संग्रामात बीएसएफच्या भूमिकेकडं दुर्लक्ष करू नये अशा शब्दात बांगलादेशला सुनावलं. अमित शहा सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात बोलत होते.