Mughal Garden : राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव बदललं; लोकांसाठी केव्हा सुरू होणार गार्डन?

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवावर हा निर्णय घेतलाय.
Mughal Garden
Mughal Gardensakal

Rashtrapati Mughal Gardens : राष्ट्रपती भवनामधील मुघल गार्डनचं बदलून आता अब 'अमृत उद्यान' करण्यात आले आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त 'आजादी के अमृत महोत्सव'वर हा निर्णय घेतलाय.

या निर्णयाची घोषणा राष्ट्रपती भवनमध्ये करण्यात आली. याआधीही दिल्लीमध्ये स्थित असलेल्या अनेक मुघल शासकांचे नावावर असलेल्या रस्त्यांचे नावही बदलण्यात आले. यातच दिल्लीच्या औरंगजेब रोडचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) रोड करण्यात आलं होतं.

Mughal Garden
Mughal Garden : मोदी सरकारने राष्ट्रपती भवन परिसरातील 'मुघल गार्डन'चे नाव बदलले, जाणून घ्या नवं नाव...

31 जानेवारी सुरू होणार गार्डन

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या नोटीसनुसार 31 जानेवारीपासून 26 मार्चपर्यंत सामान्य लोकांसाठी हे गार्डन सुरू राहणार. यानंतर 28 मार्चला फक्त शेतकरी आणि 29 मार्चला फक्त दिव्यांग लोकांसाठी हे गार्डन सुरू राहणार.

त्यानंतर पोलिस सुरक्षा बल आणि सेनाच्या घरच्या लोकांसाठी 30 मार्चला हे गार्डन सुरू राहणार. इस दरम्यान विजिटर गार्डनमध्ये असलेल्या सुंदर फूलांना न्याहारू शकेल. अमृत गार्डनमध्ये 12 प्रकारचे सुंदर ट्यूलिप फुले लावण्यात आले आहे. सामान्य लोकांसाठी हे गार्डन लवकरच सुरू होणार आहे.

Mughal Garden
Mughals Ruled India : सेनापतींच्या जीवावर मुघलांनी भारतावर केलं होत राज्य

ऑनलाइन असणार रजिस्ट्रेशन

राष्ट्रपती भवननी जारी केलेल्या नोटीसनुसार अमृत गार्डनमध्ये त्यात लोकांना जाण्याची परवागनी असेल ज्यांचं ऑनलाइन अग्रिम बुकिंगद्वारे पास घेऊन येणार. वॉक-इन एंट्रीची सुविधा नसणार.

गार्डनला भेट देण्यासाठी राष्ट्रपति भवनची वेबसाइट https://rashtrapatisachivalaya.gov.in/ वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. याशिवाय तुम्ही राष्ट्रपती भवनच्या गेट नंबर 12 वरही रजिस्ट्रेशन करू शकता. उद्यानमध्ये गेट नंबर 35 वरुन लोकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. गार्डन सकाळी 10 वा ते सायं 4 वा. पर्यंत सुरू राहणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com