Police Push Prisoner Bus After Breakdown
esakal
Amritsar Viral Video: अमृतसरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कैद्यांना न्यायालयात घेऊन जाणारी पोलिसांची बस अचानक रस्त्यात बंद पडली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, पोलिस कर्मचाऱ्यांना स्वतः खाली उतरून बसला धक्का द्यावा लागल्याचे चित्र समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.