#HappyBirthdayPM अमूलने उलगडले मोदींचे यश; दिल्या 'अमूल स्टाईल' शुभेच्छा!

टीम ईसकाळ
Tuesday, 17 September 2019

अमूलनेही आपल्या स्टाईलने त्यांच्या चित्रांचा एक व्हिडिओ तयार केलाय ज्यात मोदींचे सर्व यशस्वी निर्णय व त्यांचा विजय दाखविण्यात आला आहे.

नवी दिल्ली : आईस्क्रीव व डेअरी पदार्थांचा सर्वांत मोठा ब्रँड असलेल्या अमूलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त खूपच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अमूल कायमच आपल्या वेगळ्या धाटणीच्या जाहीरातींसाठी चर्चेत असते. आजही मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोदींच्या कार्यावर प्रकाश टाकणारा 'अमूल स्टाईल' व्हिडिओ शेअर केला आहे व मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

HappyBirthdayPM : मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

आज (ता. 17) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 69वा वाढदिवस! जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अमूलनेही आपल्या स्टाईलने त्यांच्या चित्रांचा एक व्हिडिओ तयार केलाय ज्यात मोदींचे सर्व यशस्वी निर्णय व त्यांचा विजय दाखविण्यात आला आहे. मोदींचा दुसऱ्यांदा झालेला विजय, स्वच्छ भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, मोदींचे आंतरराष्ट्रीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध, इनक्रिडेबल इंडिया, मोदी-सिवन यांची मिठी असे अनेक प्रसंग अमूलने या व्हिडिओमध्ये साकारले आहेत.

HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

गुजरातच्या 36 लाख शेतकऱ्यांकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे व्हिडिओत म्हणले आहे.

HappyBirthdayPM : नर्मदेची पूजा ते आईचा आशीर्वाद; मोदींचा आजचा कार्यक्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amul wishes PM Narendra Modi in unique style