Video : मोबाईलला आपण नावं ठेवतो, पण... आनंद महिंद्रांच नवं ट्विट!

Anand-Mahindra-Mobile
Anand-Mahindra-Mobile

सध्याचं युग हे स्मार्टफोनचे युग म्हणून ओळखले जाते. स्मार्टफोन आणि इंटरनेट नाही, तर तो या जनरेशनचा माणूस नाही, असाच समज बनत चालला आहे. मोबाईल, हॅन्डसेट अशा नावानेही स्मार्टफोन ओळखला जातो. स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न. स्मार्टफोनच्या जास्त आहारी गेल्याने अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याच्या बातम्या आपण माध्यमांतून वाचतो. मात्र, स्मार्टफोनमुळे चांगल्या गोष्टीही घडल्याच्या बातम्या त्या प्रमाणात ऐकण्यात, पाहण्यात येत नाहीत. 

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. त्यांचे प्रत्येक ट्विट सोशल मीडियावर चर्चिले जाते. अनेकदा ते आपल्या ट्विटर अकाउंटवरून सोशल मेसेज देणारा व्हिडिओ शेअर करत असतात. आताही त्यांनी असाच एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्मार्टफोनबद्दल तुमचे असणारे मत नक्कीच बदलेल. 

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातवाऱ्यांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याचे दिसते. मिठाईच्या दुकानाबाहेर बसलेल्या त्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला आहे आणि साईन लँग्वेजमध्ये ती व्यक्ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

या व्हिडिओ दिलेल्या कॅप्शनमध्ये महिंद्रा म्हणतात, मोबाईलने आपल्या वैयक्तिक जीवनावर कब्जा केला आहे, अशी आपण टीका करतो. मात्र, जगातील अनेकांचे संवाद मोबाईलमुळे पूर्ण होतात. मोबाईलनेच संवादाचे एक नवे सर्वांसाठी निर्माण केले आहे.

चालत्या-बोलत्या माणसांसाठी स्मार्टफोनचा वापर किती महत्त्वाचा आहे, हे आपण जाणतो. मात्र, ज्यांना सामान्यांप्रमाणे बोलता येत नाही, अशांसाठी मोबाईल किती प्रभावी माध्यम आहे, हे यातून दिसून येते. 

महिंद्रांनी शुक्रवारी (ता.27) हा व्हिडिओ शेअर केला असून आतापर्यंत त्या व्हिडिओला 21 हजारांहून जास्त जणांनी लाईक केला आहे. साडेतीन हजारांहून अनेकांनी या ट्विटला रिट्विट केले आहे. तर 1 लाख 66 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com