

Anant Ambani Tirupati Temple electric bus free
esakal
Anant Ambani Donation : अनंत अंबानी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला 27.5 कोटी रुपयांच्या 25 इलेक्ट्रिक बस देण्याची घोषणा केली. रविवारी (28 जून) श्री वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने ही मदत करण्यात येणार आहे. बससोबतच चालकांचे वेतन आणि चार्जिंग सुविधेचाही खर्च रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उचलण्यात येणार आहे.