esakal | सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न, जगनमोहन यांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

jagan mohan reddy.jpg

इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर राज्य सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न, जगनमोहन यांचा गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर गंभीर आरोप केले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 

न्या. रामण्णा यांच्या मुली जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सहभागी होत्या आणि त्याचा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या खटल्यांवरील सुनावणीवर परिणाम झाला, असल्याचा आरोप मुख्यमंत्री जगनमोहन यांनी केला आहे. 

हेही वाचा- Hathras Case : हाथरस प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे

आपल्या तक्रारीत जगनमोहन यांनी म्हटले आहे की, न्या. रामण्णा हे आमचे सरकार अस्थिर करण्यासाठी नायडू यांना साथ देत आहेत. ते उच्च न्यायालयाच्या कामकाजात दखल देत असून तेथील न्यायाधीशांवर दबाव टाकत आहेत. रेड्डी यांच्यानुसार न्या. रामण्णा हे चंद्राबाबू नायडू यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि विद्यमान सरकार पाडण्यासाठी मदत करत आहेत. 

हेही वाचा- भारत होतोय शस्त्रसज्ज! चिनी ड्रोनचा सामना करणार रुस्तम-२ आणि इस्त्राईली हेरॉन

देशात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीविरोधात सरन्यायाधीशांकडे न्याय व्यवस्था प्रभावित करण्याच्या तक्रारीची ही पहिलीच वेळ आहे. जगनमोहन यांनी आंध्र प्रदेशातील न्याय यंत्रणेची तटस्थता कायम ठेवण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली आहे. 

loading image