धक्कादायक! जन्मदात्या बापाने तीन महिन्याच्या मुलीला 70 हजारांना विकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

धक्कादायक! जन्मदात्या बापाने तीन महिन्याच्या मुलीला 70 हजारांना विकले

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका तीन महिन्यांच्या चिमुकलीला तिच्या वडिलांनी 70 हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तर पुढे 2 महिन्यात 7 वेळा बाळाची खरेदी-विक्री झाल्याचंही समोर आले. या प्रकरणी बाल तस्करी करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Andhra Pradesh father sold his new born baby daughter for Rs 70000)

हेही वाचा: ‘बिमस्टेक’ देशांना मोदींची साद; बंगालच्या उपसागरातील देशांची सनद

या बाबत बाळाची आई आणि आजीने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी नवजात बाळाची सुटका केली असून तीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. बाळाची अखेर विजयवाडा येथून सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुकलीच्या वडीलांनी तीला 70 हजार रुपयांना विकले होते. पुढे या मुलीची अनेकांना विक्री करण्यात आली. बाळाची शेवटची विक्री 2,50,000 रुपयांना झाली होती.

हेही वाचा: काँग्रेसच देश सांभाळू शकते - नाना पटोले

या मुलीचा बाप म्हणजेच मुख्य आरोपीला तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. त्याने हे बाळ गावातील एका विवाहित महिलेला 70,000 रुपयांना विकले. नंतर त्या महिलेने हे बाळ 1,20,000 रुपयांना हैदराबादच्या दिलशुक नगरच्या एका व्यक्तीला विकले. पुढे या व्यक्तीने बाळाला 1,87,000 रुपयांना नूरजहाँला विकले. नूरजहाँने खम्मम जिल्ह्यातील अनुभोजू उदय किरण या अन्य आरोपीच्या मदतीने हे बाळ पुढे 1 लाख 90 हजारांना विकले. बाळाची शेवटची विक्री 2,50,000 रुपयांना झाली होती.

Web Title: Andhra Pradesh Father Sold His Newborn Baby Daughter For Rs 70000

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top