esakal | अंधश्रद्धेचा कळस! नागीण घेतेय बदला; 26 जणांना डसली अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

angry naagin angry at killing snake bites 26 people at uttar pradesh

एकाने नागपंचमीच्या दिवशी नागाला मारल्यानंतर चिडलेली नागीण तब्बल 26 जणांना डसली. सहा जनावरांनाही तिने चावा घेतल्याचं बोललं जात आहे. स्थानिक नागरिक अंधश्रद्धेचे बळी ठरत असल्याचीही चर्चा आहे.

अंधश्रद्धेचा कळस! नागीण घेतेय बदला; 26 जणांना डसली अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश) - एकाने नागपंचमीच्या दिवशी नागाला मारल्यानंतर चिडलेली नागीण तब्बल 26 जणांना डसली. सहा जनावरांनाही तिने चावा घेतल्याचं बोललं जात आहे. स्थानिक नागरिक अंधश्रद्धेचे बळी ठरत असल्याचीही चर्चा आहे. सहा जनावरांनाही तिने चावा घेतला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बहराईच जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिक गाव सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.

चिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...

नागाचा बदला घेत असल्याच्या कथा चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. पण, बहराईच जिल्ह्यात ही घटना घडत आहे. नाग पंचमीच्या दिवशी नाग मारल्यामुळे संतप्त नागीण आता परिसरातील नागरिकांना डसत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शंकरपूर, चिलबिला, बेलभरिया यासह काही खेड्यांमध्ये सापाने 26 नागरिकांसह सहा जनावरांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थ आपल्या मुलांना नातेवाईकांकडे राहायला पाठवत आहेत. शंकरपूर गावातील रहिवासी इबरार हे जनावरांना खायला घालत होते. यावेळी त्यांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना साप दिसल्यावर त्याला मारले. यानंतर दोन दिवसांत संदीप, गुलाबी देवी, शीला देवी, माया देवी, ढाल्ला, नेहा, धर्म प्रकाश, विपिन, चिराकू, भागीरथ यांची पत्नी नगरीया, बैधे, पवन यासह २६ गावकऱ्यांना सापाने चावा घेतला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

Video: दारूड्याचा अर्धा तास कोब्रासोबतचा थरार पाहाच...

साप चावत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाल्यानंतर सापाच्या जोडप्यातील एकाला मारल्यामुळे नागीण बदला घेत असल्याची माहिती पुढे येऊ लागली. सापाने परिसरातील गावांमध्ये दहशत निर्माण केली आहे. सर्पदंश झालेल्या एकाने सांगितले की, झोपेत असताना मला साप चावला आहे. साप अनेकांना चावत असल्यामुळे मुलांना नातेवाईकांकडे पाठवले आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र बाबागंजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक सिंह यांनी सांगितले की, रुग्णालयात सर्पाची लस उपलब्ध आहे. सापाने दंश केल्यानंतर अनेकांना ती दिली आहे. पण, सापाने दंश केल्यानंतर रुग्णास रुग्णालयात नेण्याची त्वरित झाली पाहिजे.'

...तोपर्यंत हातातील कोब्रा सोडलाच नाही

loading image