AAP : ‘आप’च्या आणखी एका मंत्र्याची चौकशी

‘ईडी’ने दिल्ली सरकारचे परिवहन आणि कायदा मंत्री कैलास गेहलोत यांना बोलावून साडेपाच तास चौकशी केली.
AAP
AAPesakal

नवी दिल्ली : बहुचर्चित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांमागील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचे शुक्लकाष्ठ कायम आहे. याअंतर्गत आज ‘ईडी’ने दिल्ली सरकारचे परिवहन आणि कायदा मंत्री कैलास गेहलोत यांना बोलावून साडेपाच तास चौकशी केली.

AAP
Mental Health: तुमच्या 'या' सवयी मानसिक आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह आदी जणांना अटक झाली आहे. त्यात आता कैलास गेहलोत यांनाही ईडीने आज चौकशीसाठी पाचारण केले. मद्यधोरण प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी त्यांना समन्स बजावण्यात आल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे होते. ‘ईडी’च्या पहिल्याच बोलावण्यावरून (समन्स) कैलास चौधरी ‘ईडी’समोर हजर झाले होते. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी त्यांची साडेपाच तास चौकशी केली. या चौकशीनंतर कैलास चौधरी यांनी ‘ईडी’ कार्यालयातून बाहेर पडताना साडेपाच तास चौकशी झाल्याचे सांगितले. तसेच ‘ईडी’ने पुन्हा बोलावल्यास आपण पुन्हा एकदा हजर होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. कैलास गेहलोत यांनी मद्यधोरणाचा मसुदा तयार केल्याचा आरोप आहे. यासोबतच या गैरव्यवहार प्रकरणातील आणखी एक आरोपी विजय नायर हा गेहलोत यांच्या निवासस्थानी येऊन राहायचा असाही आरोप आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘ईडी’ने या मसुद्याशी संबंधित मुद्द्यावरच त्यांची चौकशी केल्याचे समजते.

आतिशी यांना अटकेची भीती

कैलास गेहलोत यांच्या समन्सनंतर दिल्ली सरकारमधील आणखी एक मंत्री आतिशी यांनी स्वतःच्या अटकेची भीती आज बोलून दाखविली. आतिशी म्हणाल्या, की आज कैलास गेहलोत यांना बोलावले. उद्या मला बोलावले जाऊ शकते. सौरभ भारद्वाज यांनाही बोलावले जाऊ शकते. आपल्याला ‘ईडी’कडून अटकही होऊ शकते. हे सर्व आम आदमी पक्षाला संपविण्यासाठी होत आहे. मात्र यामुळे आम्ही घाबरणार नाही असा इशारा आतिशी यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com