अँटी कोरोना मिठाईसह बेकर्स देतायत 'इम्युनिटी संदेश'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 July 2020

कोरोनाच्या या संकटात अँटी कोरोना मिश्टी, व्हिटेलिटी मिश्टी नावाने मिठाई तयार केल्या असून त्यासोबत बेकर्सनी इम्युनिटी संदेशही दिला आहे.

कोलकाता - कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प झाले. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर दुकाने उघडण्यात येत आहे. कोलकात्यात मिठाई व्यावसायिकांनी तर कोरोनाच्या या संकटात अँटी कोरोना मिश्टी, व्हिटेलिटी मिश्टी तयार केल्या असून त्यासोबत इम्युनिटी संदेशही दिला आहे. कोलकात्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. 

मिठाई व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात लोकांना त्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी उपय़ुक्त अशा मिठाईची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मिठाई औषधी वनस्पतींपासून तयार करण्यत आली असून रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करणारी असल्याचा दावा मिठाई निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजुला आरोग्य तज्ज्ञांनी मात्र हे विज्ञानाला धरून नाही आणि सर्व काही नाटक असल्याचंही म्हटलं आहे. 

हे वाचा - पुणेकरांनो, काळजी घ्या! पुण्यासाठी ऑगस्ट महिना अधिक काळजीचा

कोरोनाच्या संकटकाळात तोंड गोड करण्यासाठी मिठाई खरेदी करणाऱ्यांनी म्हटलं की, ही मिठाई आरोग्यासाठी फायद्याची तर असेल पण त्याशिवाय मिठाई आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. काहींना यामध्ये औषधी वनस्पती असल्यानं आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं वाटणं चुकीचं नाही असंही म्हटलं जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याआधी पश्चिम बंगाल सरकार एक खास 'संदेश' बाजारात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली होती. शरीरात प्रतिकारशक्ती तयार कऱण्यासाठी मदत होईल असं आरोग्य संदेश बनवणार असल्यचं मंत्री मांतुराम पाखीरा यांनी सांगितलं होतं. सुंदरवनातील मध आणि गाईच्या दुधापासून तयायर कऱण्यात आलेल्या या पदार्थामध्ये तुळशीचा अर्कही मिसळण्यात येणार आहे. यात चवीसाठी कोणत्या प्रकारचे कृत्रिम रसायन वापरणार नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anti corona mishti bengali mithai immunity sandesh