esakal | पुणेकरांनो, काळजी घ्या! पुण्यासाठी ऑगस्ट महिना अधिक काळजीचा!
sakal

बोलून बातमी शोधा

August is likely to be even more difficult for Pune in Corona pandemic

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.  एकट्या जुलै महिन्यात एक लाख 30 हजारांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.  हे प्रमाण मार्चमध्ये 922 , एप्रिल मध्ये 10 हजार 727,  मेमध्ये 37 हजार 671 तर जून मध्ये 66 हजार 670 एवढे होते. 

पुणेकरांनो, काळजी घ्या! पुण्यासाठी ऑगस्ट महिना अधिक काळजीचा!

sakal_logo
By
संभाजी पाटील

पुणे: मार्चपासून सलग तीन महिन्यांचा लॉकडाऊन त्यानंतर सव्वा महिन्यांचा 'अनलॉक', पुन्हा दहा दिवसांचे लाॅकडाउन असतानाही पुण्यात एकट्या जुलै महिन्यात आत्तापर्यंत 33 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पुढील 15 दिवसांत तब्बल 50 हजार रुग्णांची त्यात भरपडेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना पुण्यासाठी आणखी कठीण जाण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्येच पुण्यात 50 हजारांचा टप्पा ओलांडला गेला. संपूर्ण मार्च महिन्यात पुण्यात केवळ 38 पॉझिटिव्ह रुग्ण होते. एप्रिल मध्ये ही संख्या 1480 वर जाऊन पोहोचली आणि मृत्यू दरही 5.68 टक्के झाला. मात्र या काळात लाॅकडाउन असल्याने ही संख्या आटोक्यात येईल, अशी अपेक्षा होती. पण मे महिन्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच गेला. मे महिन्यामध्ये एकूण 4 हजार 954 रुग्ण आढळून आले. लॉकडाउनच्या काळात कारखाने, दुकाने, कार्यालये बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. नागरिकांच्या रेट्यामुळे जून मध्ये राज्य सरकारने 'अनलॉक' केले.  लाॅकडाउन काही प्रमाणावर शिथिल केले. पुण्यात अनलॉक झाल्यानंतर मात्र,  ज्या भागात रुग्णांची संख्या मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये नगण्य होती,  त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यात धनकवडी-सहकारनगर, कोथरूड , एरंडवणे  बिबवेवाडी, वारजे कर्वेनगर सिंहगड रस्ता आदी भागाचा समावेश आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये रुग्ण संख्या अधिक असणाऱ्या हडपसर मुंढवा, भवानी पेठ, येरवडा, कसबा-विश्रामबाग वाडा आदी भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात यश आले. गेल्या महिनाभरात कमीत कमी निर्बंध असलेल्या भागातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 


पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात आजही 87 भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले असून, तेथे लाॅकडाउनचे नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र ज्या ठिकाणी सूट देण्यात आली आहे तेथे मास्क घालणे,  शारीरिक अंतर , सॅनिटायझरचा वापर आदी नियम पाळले जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच पुण्यात गुणाकार पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.  एकट्या जुलै महिन्यात एक लाख 30 हजारांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.  हे प्रमाण मार्चमध्ये 922 , एप्रिल मध्ये 10 हजार 727,  मेमध्ये 37 हजार 671 तर जून मध्ये 66 हजार 670 एवढे होते. 

पुण्यात आत्तापर्यंत तीस हजार रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59 टक्के आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत एकट्या जुलै महिन्यातील  मृत्यूचा दरही  1.70 टक्क्यांपर्यत नियंत्रित झाला आहे. मात्र

धक्कादायक! पुण्यात आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या; पतीने घेतला गळफास

ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही. 
ऑगस्ट महिन्यात चाचण्या आणखी वाढवण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत एकूण रुग्णांची संख्या एक लाखांच्या घरात तर सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आसपास राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी पुढचा महिना अधिक काळजीचा आणि खबरदारी घेण्याचा ठरणार आहे.

प्रबळ इच्छाशक्तीच! पुण्यात शंभर वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

अशी आहे पुण्यातील रुग्णसंख्या

 मार्च : 38

 एप्रिल : 1480

 मे : 4954

 जून : 10756

जुलै (आतापर्यंत) : 33013

दृष्टीक्षेपात कोरोना

पुण्यातील एकूण रुग्णसंख्या : 50430

सक्रिय रुग्णसंख्या : 19135

 बरे झालेले रुग्ण : 30080 

loading image