
राखीव पदावर महिला नसेल तर पुरुष उमेदवाराला नियुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश
विधानसभेत रिपोर्टर (वार्ताहर) पदाच्या भरतीदरम्यान एकही महिला उमेदवार आरक्षित नसलेल्या वर्गात पात्र ठरली नाही तर ते पद रिक्त न ठेवता त्या पदावर भरतीसाठी पुरुष उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. (appoint a male applicant on unreserved post if female candidate not found high court said)
हेही वाचा: विमान हवेत असताना केबिनमधून निघाला धूर- व्हिडिओ व्हायरल
विधानसभेत रिपोर्टर (वार्ताहर) पदाच्या भरतीसाठी महिला उमेदवारसाठी आरक्षित नसलेल्या वर्गात पद राखीव ठेवलं जातं. जर एकही महिला उमेदवार आरक्षित नसलेल्या प्रवर्गात पात्र ठरली नाही तर ते पद रिक्त असतं अशाच एका प्रकरणात एका पुरुष उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
यावर सुनावणी करताना न्यायमूर्तीनी या महिला आरक्षित उमेदवार पदाच्या जागी याचिकाकर्त्या पुरुष उमेदवाराची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याचिकाकर्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा: फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल : ज्योतिरादित्य सिंधिया
हे प्रकरण छत्तीसगड उच्च न्यायालयातील आहे. छत्तीसगड विधानसभा सचिवालयात रिपोर्टर पदासाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीत चार पदे आरक्षित नसलेल्या प्रवर्गासाठी होती. यातील एक पद महिलांसाठी राखीव होते.
निवड यादीत आरक्षित नसलेल्या प्रवर्गातील तीन उमेदवारांची निवड करण्यात आली मात्र या प्रवर्गातील राखीव पदासाठी महिला उपलब्ध नसल्याने हे पद रिक्त ठेवण्यात आले होते. यावर एका याचिकाकर्त्याने छत्तीसगड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावर न्यायालयाने त्याच्या बाजूला निर्णय देत महिला आरक्षित उमेदवार पदाच्या जागी याचिकाकर्त्या पुरुष उमेदवाराची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा सचिवालयाने याचिकाकर्त्याची रिपोर्टर (वार्ताहर) म्हणून नियुक्ती केली आहे.
Web Title: Appoint A Male Applicant On Unreserved Post If Female Candidate Not Found High Court Said
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..