आता 'मुख्य आर्थिक ज्योतिषी' नेमा; चिदंबरम यांचा सीतारामण यांना टोला

नासानं आपल्या स्पेस टेलिस्कोपनं घेतलेली अवकाशातील ग्रहांची काही छायाचित्रे शेअर केली होती. नासाचं हे ट्विट सीतारामण यांनी रिट्विट केलं होतं.
Sitharaman_Chidambaram
Sitharaman_Chidambaram

नवी दिल्ली : नासाच्या स्पेस टेलिस्कोपमधून पहिल्यांदाच विश्वातील काही छायाचित्रे शेअर करण्यात आली. नासाचं हे ट्विट सीतारामण यांनी रिट्विट केलं होतं. यावरुन आता माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. मुख्य आर्थिक सल्लागाराच्याऐवजी आता नवा मुख्य आर्थिक ज्योतिषी नेमा असं त्यांनी म्हटलं आहे. (Appoint new Chief Economic Astrologer P Chidambaram dig at Sitharaman)

चिदंबरम म्हणाले, "देशात महागाईचा दर ७.०१ टक्क्यांवर तर बेरोजगारीचा दर ७.८० टक्क्यांवर पोहोचलेला असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अवकाशातील गुरु, प्लुटो आणि युरेनस ग्रहांचे फोटो ट्विट केल्याबद्दल आम्हाला आजितबात आश्चर्य वाटलेलं नाही"

अर्थव्यवस्था हाताळण्यात सीतारामण यांनी स्वतःचं आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांचं स्कील आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतर आता अर्थमंत्र्यानी ग्रहांना अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी साकडं घातलं आहे. त्यांनी आता CEA अर्थात चीफ इकॉनॉमिक अॅस्ट्रॉलॉजर अर्थात मुख्य आर्थिक ज्योतिषाची नियुक्ती करावी, अशा शब्दांत चिदंबरम यांनी सीतारामण यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

Sitharaman_Chidambaram
पालघर : वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या सर्व 10 कामगारांची सुटका

दरम्यान, बुधवारी काँग्रेसनं अर्थमंत्री सीतारामण यांच्यावर टीका करताना देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असताना तिच्या रिकव्हरी ऐवजी सीतारामण यांना युरेनस आणि प्लुटोमध्ये जास्त रस असल्याचं म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com