पालघर : वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या सर्व 10 कामगारांची सुटका

एनडीआरएफच्या जवानांच्या बचाव मोहिमेला मोठं यश
Palghar Vaitarna River Resucue Operation
Palghar Vaitarna River Resucue Operation

पालघर : मुंबई-बडोदा महामार्गवर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं १० कामगार इथं अडकून पडले होते. गेल्या १८ तासांपासून हे कामगार इथेच अडकलेले होते. अखेर एनडीआरएफच्या मदतीनं या सर्व कामगारांची सुखरुप सुटका करण्यात यश मिळालं आहे. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. (Palghar Safe release of all construction workers of Bridge trapped in Vaitarna river basin)

काल दुपारनंतर वैतरणा नदीला पूर आला होता त्यावेळी या नदीवरील उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. त्यावेळी बार्जमध्ये काही कामगार काम करत होते. पण अचानक नदीला पूर आल्यानं १० कामगार तिथं अडकून पडले होते. एनडीआरएफच्या मदतीनं गेल्या १८ तासांपासून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर गुरुवारी सकाळी यातील १० कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली.

Palghar Vaitarna River Resucue Operation
पालकांनो लक्ष असू द्या! कुठे शाळा बंद? प्रशासन काय म्हणतंय?

दरम्यान, रात्री देखील एनडीआरएफकडून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते पण अंधार असल्यानं यामध्ये अडथळे येत होते, त्यामुळं बचाव मोहिम थांबवण्यात आली होती. पण सकाळी पुन्हा ही मोहिम सुरु करण्यात आली, या मोहिमेला गुरुवारी सकाळी यश आलं.

Palghar Vaitarna River Resucue Operation
Maharashtra Rain update : राज्यभर पावसाने दाणादाण, या ७ जिल्ह्यांत इशारा

गेल्या दोन दिवसांपासून पालघर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीच्या प्रवाहाने रौद्ररूप धारण केले आहे. वैतरणा नदीच्या उपनद्या वरील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वैतरणा नदी पात्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर आणि बहाडोली गावादारम्यान वैतरणा नदी पात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. वैतरणा नदी पात्रात सुरू असलेल्या कामासाठी जी आर इन्फ्रा कंपनीच्या वतीने बार्ज तैनात करण्यात आला आहे. नदी पात्राच्या मध्यभागी पिलर उभा करण्यासाठी बार्जवर कामगार तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी दुपारी वैतरणा नदी पात्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने नदी पात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जचा नांगर तुटल्याने बार्ज नदी पात्रात हेलकावे खाऊ लागला होता. त्यामुळे बार्जवर अडकलेल्या कामगारांनी मदतीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ एनडीआरएफ च्या पथकाला पचारण केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com