अर्थव्यवस्थेला चांगले दिवस! जीएसटी कलेक्शनने जुने रेकॉर्ड मोडले; १.६८ लाख कोटींचे जीएसटी संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST collection breaks old record

जीएसटी कलेक्शनने जुने रेकॉर्ड मोडले; १.६८ लाख कोटींचे संकलन

एप्रिल महिना सरकारसाठी चांगला राहिला आहे. जीएसटी कलेक्शनने सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी होते. जीएसटी (GST) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी संकलनाने एकाच महिन्यात १.५० लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी (ता. १) ही आकडेवारी जाहीर केली. (GST collection breaks old record)

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात जीएसटी संकलन १.४२ लाख कोटी होते. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात २६ लाख कोटींची वाढ झालेली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हे एक चांगले चिन्ह आहे. एप्रिल २०२२ साठी एकत्रित जीएसटी (GST) महसूल १,६७,५४० कोटी आहे. ज्यामध्ये सीजीएसटी ३३,१५९ कोटी, एसजीएसटी ४१,७९३ कोटी, आयजीएसटी ३६,७०५ कोटींसह वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेले आयजीएसटी ८१,९३९ कोटी आहे. सेस १०,६४९ कोटी आहे. ज्यात वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ८५७ कोटींचा समावेश आहे.

सरकारने (government) ३३,४२३ कोटी साजीएसटी आणि आयजीएसटीकडून २६,९६२ कोटी एसजीएसटी निश्चित केले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर एप्रिल २०२२ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ६६,५८२ कोटी आणि एसजीएसटीसाठी ६८,७५५ कोटी आहे. एप्रिल २०२२ चा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा २० टक्के अधिक आहे.

मार्च २०२२ मध्ये एकूण ७.७ कोटी ई-वे बिले व्युत्पन्न झाली. जी फेब्रुवारी २०२२ मध्ये व्युत्पन्न झालेल्या ६८ कोटी ई-वे बिलांपेक्षा १३ टक्के अधिक आहे. हे देशातील व्यावसायिक क्रियाकलापांची वेगवान गती दर्शवते. यावर्षी एप्रिलमध्ये जीएसटीआर-३बीमध्ये १.०६ कोटी जीएसटी (GST) रिटर्न भरले गेले. त्यापैकी ९७ लाख रिटर्न मार्चमध्ये भरले गेले. एप्रिल २०२१ मध्ये एकूण ९२ लाख रिटर्न भरले गेले.

टॅग्स :economyGST