
दिल्लीतील कर्नाटक भवन पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी कोणत्याही राजकीय कार्यक्रमामुळे नाही, तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील भांडणामुळे. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) आणि उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. आता अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.