esakal | लष्कर भरती घोटाळा: 6 लेफ्टनंट कर्नलसह अनेकांवर CBI ने दाखल केला गुन्हा

बोलून बातमी शोधा

cbi

लष्कर भरती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषन ब्यूरोने (CBI) सहा लेफ्टनंट कर्नलसह अनेक अधिकारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

लष्कर भरती घोटाळा: 6 लेफ्टनंट कर्नलसह अनेकांवर CBI ने दाखल केला गुन्हा
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- लष्कर भरती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषन ब्यूरोने (CBI) सहा लेफ्टनंट कर्नलसह अनेक अधिकारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने याप्रकरणात  तीनपेक्षा अधिक राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. सैन्य मुख्यालयाच्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने भ्रष्टाचारविरोधी कायदा आणि गुन्हेगारी षडयंत्रानुसार गुन्हा दाखल केला आहे. सैन्य मुख्यालयाकडून सीबीआयकडे जी तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यात लेफ्टनंट कर्नल मेजर रँकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तपास एजेन्सीची छापेमारी एक डझनपेक्षा अधिक जागांवर होत आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

सीबीआयने सेवा निवड बोर्डाच्या माध्यमातून सैन्यामध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीमध्ये कथित भ्रष्टाचारप्रकरणी लेफ्टनंट कर्नल रॅकचे 6 अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं की, सैना हवाई रक्षा कोरच्या लेफ्टनंट कर्नल भगवान या भर्ती घोटाळ्यामागील मास्टरमाईंड असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने ब्रिगेडियर वीके परोहित यांच्या तक्रारीनुसार कारवाई केली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आलाय की, 28 फेब्रुवारी 2021 मध्ये माहिती मिळाली की, नवी दिल्लीच्या बेस हॉस्पिटलमध्ये मेडिकल परीक्षेसंबंधी अनेक बड्या अधिकाऱ्यांनी लाच घेतली आहे.  

जर्मनी, फ्रान्स, इटलीने थांबवला एस्ट्राझेनेकाचा वापर; लस सुरक्षित असल्याचा WHO...

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लेफ्टनंट कर्नल भगवान आणि नायब सुभेदार कुलदीप सिंह यांनी कथित रित्या लाच घेतली आहे. एजेन्सीने 23 लष्कर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लाच घेणे आणि लाच मागण्याप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. 

माजी मुख्यमंत्री अडचणीत, कुटुंबीयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

लष्कर भरती घोटाळ्याचे कनेक्शन उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरले आहे. यात एसएसबी सिलेक्शन सेंटर, बेस हॉस्पिटल, भर्ती मुख्यालय आणि अनेक सैन्य अधिकारांचा समावेश आहे. या घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या पत्नी, आई, वडील, मित्र यांच्यापर्यंत लाच पोहोचली असल्याचं सांगण्यात आलंयृ. सीबीआय या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे आल्यानंतर यात मोठे रॅकेट असल्याचं समोर आलं. या प्रकरणात ले. कर्नल, मेजरसह दोन डझन सैन्य अधिराऱ्यांचे नाव आले आहे. तसेच यामध्ये अधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचं स्पष्ट झालंय.