बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 30 डिसेंबर 2019

बिपीन रावत उद्या (31 डिसेंबर) लष्करप्रमुख पदावरून नियुक्त होत असताना त्यांना आजच नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असतील. केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली होती.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज (सोमवार) लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिपीन रावत उद्या (31 डिसेंबर) लष्करप्रमुख पदावरून नियुक्त होत असताना त्यांना आजच नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असतील. केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी सीडीएस पदाला मंजुरी दिली होती. सीडीएस फोर स्टार जनरल अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती. रावत यांनी लष्करप्रमुख म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या पदाच्या शर्य़तीत तेच प्रमुख दावेदार होते. आज त्यांची नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

संजय राऊत नाराज, शिवसेनेत नाराजी नाट्य शिगेला

नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू असतानाच रावत यांनी थेट भाष्य करीत एका नव्या वादाला तोंड फोडले होते. लोकांना हिंसाचारासाठी चिथावणी देणारे कधीच नेते असू शकत नाहीत, असे विधान केले होते. विरोधी पक्षांनी लष्करप्रमुखांचे हे काम नव्हे असे म्हणत टीका केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army chief General Bipin Rawat named India's first Chief of Defence Staff