Army Day 2021: 15 जानेवारीला का साजरा केला जातो 'आर्मी डे'?

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 15 January 2021

भारतीय लष्कर आज 73 वा 'आर्मी डे' साजरा करत आहे.

नवी दिल्ली- भारतीय लष्कर आज 73 वा 'आर्मी डे' साजरा करत आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये करियप्पा ग्राऊंटवर सेना दिवस परेडचे आयोजन करण्यात आले होते. लष्कर प्रमुख मुकुंद एम. नरवणे परेडला सलामी देतील. 15 जानेवारी हा भारतीय सैन्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. 

2020 मधील आव्हानांना जवानांचे चोख प्रत्युत्तर; 'आर्मी डे'निमित्त...

का साजरा केला जातो 'आर्मी डे'?

15 जानेवारीला आर्मी डे साजरे करण्याचे दोन मोठे कारणं आहेत. 15 जानेवारी 1949 दिवशी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. दुसरं म्हणजे याच दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ बनवण्यात आलं होतं. अशाप्रकारे लेफ्टिनेंट करियप्पा लोकतांत्रिक भारताचे पहिले सेना प्रमुख बनले होते. केएम करियप्पा 'किप्पर' नावाने प्रसिद्ध आहेत.

केएम करियप्पा ग्राऊंटवर कार्यक्रमांचे आयोजन

आर्मी डेच्या निमित्त संपूर्ण देश जवानांचं असामान्य धैर्य, शहीद जवान यांच्या बलिदानाची आठवण काढतो. देशभरातील वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये परेड काढली जाते. या खास क्षणी फील्ड मार्शल एम करियप्पा परेड ग्राऊंडवर सेना दिवस समारोहसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

शनिवारी 2 वाजता निर्णय देईन; महिला खासदाराच्या FB पोस्टमुळे तृणमूलच्या अडचणीत...

कसा साजरा केला जातो आर्मी डे 

या दिवशी इंडिया गेटवर बनलेल्या अमर जवान ज्योतीवर शहीदांना श्रद्धांजली दिली जाते. तसेत शहीदांच्या विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सेना मेडल आणि अन्य पुरस्काराने सन्मानित केले जाते. भारतीय आर्मीची स्थापना 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कोलाकातामध्ये केली होती. आज भारतीय आर्मीचे 53 कँटोनमेंट बोर्ड आणि 9 आर्मी बेस आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Day 2021 why we celebrate army day on 15 January