Jammu - Kashmir News : 'झूम'ची धूम; दोन गोळ्या लागूनही निकराने लढत राहिला लष्कराचा हा श्वान

झूमने घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधलं आणि त्यांच्यावर हल्ला केला.
Army Dog
Army DogSakal

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कुत्रा सोमवारी गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा दलांनी रविवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरू केली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी, लष्कराने झूम नावाच्या आपल्या शिकारी कुत्र्याला ज्या घरात अतिरेकी लपून बसले होते त्या घरात पाठवले. झूम हा उच्च प्रशिक्षित, क्रूर आणि वचनबद्ध कुत्रा आहे. दहशतवाद्यांना शोधून त्यांना जखमी करण्यासाठी त्याला प्रशिक्षित करण्यात आलं आहे.

Army Dog
LIVE Update: शिवसेनेच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणीची शक्यता

झूम दक्षिण काश्मीरमधील अनेक ऑपरेशन्सचा भाग आहे. सोमवारी, झूमला नेहमीप्रमाणे दहशतवादी लपलेल्या घरामध्ये जाण्याची कामगिरी देण्यात आली होती. मात्र ऑपरेशन दरम्यान, कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Army Dog
Viral Video: PM मोदी स्वत: सुरक्षा कवच तोडून बाहेर आले अन्...; काय झालं पाहा

झूमने दहशतवाद्यांना शोधले आणि त्यांच्यावर हल्ला केला ज्या दरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या. अधिकार्‍यांनी सांगितले की, स्वतःवर हल्ला होऊनही कुत्र्याने लढाई सुरूच ठेवली आणि त्याचे काम पार पाडले, ज्यामुळे दोन अतिरेकी मारले गेले. झूमला लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले, तर अनेक जवान जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com