देशाची सुरक्षा आता तीन बॅचमेटच्या हाती; तिघांच्या बाबतीतही 'हे' आहे साम्य

वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : लेफ्ट. जनरल नरवणेंच्या नियुक्तीनंतर तीन बॅचमेट्सच्या हाती देशाची सुरक्षा राहणार आहे. ३१ डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मनोज नरवणे हे नवे लष्कर प्रमुख म्हणून सूत्र हाती घेणार आहेत. अॅडमिरल करमबीर सिंह यांनी ३१ मे रोजी नौदल प्रमुख पदाची सूत्र हाती घेतली होती. तर एअर चीफ मार्शल भदोरिया हे ३० सप्टेंबर रोजी हवाईदलाच्या प्रमुखपदी विराजमान झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वयाच्या 17व्या वर्षी ते तिघेही नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये 1976 साली दाखल झाले होते. त्यावेळी एकत्र प्रशिक्षण घेतलेल्या त्या तिघांमध्ये एकच समान गोष्ट होती ती म्हणजे तिघांचेही वडील हवाई दलात होते. आता तेच तिघे देशाच्या संरक्षण दलात सर्वोच्च पदावर असणार आहेत.

पुरस्कार वापसीला सुरवात; मुजतबा हुसैन 'पद्मश्री' परत करणार

देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा अशी घटना घडणार आहे की, तीन मित्र देशाचे हवाई दल, नौदल आणि लष्कराचे प्रमुख असणार आहेत. याआधी डिसेंबर 1991मध्ये एनडीएच्या 81व्या पासिंग आउट परेडला तिन्ही सैन्यदलाचे तत्कालिन प्रमुख उपस्थित होते. जनरल एस एफ रॉड्रिग्ज, अॅडमिरल एल रामदास आणि एअर चिफ मार्शल एन. सी. सूरी हे तिघेही एकाच बॅचचे होते.

'ते भगवी वस्त्रे घालतात अन्‌ बलात्कार करतात'

नौदल प्रमुख करमबीर सिंग आहेत तर एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया हे आहेत. या तिघांनीही एकत्र 1976 मध्ये एनडिए जॉईन केली होती. तिघेही एनडीएच्या 56व्या प्रशिक्षण सत्राचे प्रशिक्षणार्थी होती. एनडीए कॅडेटचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तिघेही 1980 मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. देशाच्या या सर्वोच्च पदावर नियुक्ती होताना, जन्मतारीख, कारकिर्दीतील कामगिरी, सेवा जेष्ठता या बाबी तपासल्या जातात. या तिघांची नियुक्तीही अशीच झाली आहे. हे तिघे मित्र आहेत आणि योगायोगाने अशी तीन मित्रांची नियुक्ती झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army manoj naravane navy karambir singh air force bhadauria are batchmate in NDA