
Viral: कुणी प्रसादात मिसळलं, तर कुणी जेवणात टाकून काढला काटा! काय आहे 'अर्सेनिक'?
Arsenic Crime weapon various murder cases: मुंबईतील ती सांताक्रुझची मर्डर केस चर्चेत आली आहे. पोलिसांना असा संशय आहे की उद्योगपती कमलकांत शाहला त्याच्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं मारलं. त्यासाठी त्यांनी आर्सेनिकचा उपयोग केला होता. आतापर्यतच्या बऱ्याचशा घटनांमध्ये आर्सेनिकचा वापर करण्यात आला आहे. हे जीवघेणे आर्सेनिक नेमके आहे तरी काय?
कमलकांतच्या मर्डर केसनंतर आर्सेनिक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याविषयी सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारची माहिती शोधली आणि वाचली जात असल्याचे दिसून आले आहे. कमलकांतच्या हत्येनंतर जेव्हा त्याचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले तेव्हा त्याच्या शरीरात आर्सेनिक आणि थॅलियम सापडले होते. पोलिसांना असा संशय आहे की, कमलकांतला जेव्हा मारण्यात आले तेव्हा त्या शस्त्राला आर्सेनिक लावण्यात आले होते.

Arsenic Crime weapon
पूर्वी राजा महाराजांना मारण्यासाठी विषप्रयोग केला जायचा. ही गोष्ट अनेकांना माहिती आहे. त्याविषयीच्या अनेक गोष्टी दंतकथा म्हणून सांगितल्या जातात. आता आर्सेनिकच्या मदतीनं हत्या केल्याचे दिसून येत आहे. जगप्रसिद्ध रहस्यकथाकार अगाथा ख्रिस्तीच्या ए एज फॉर आर्सेनिक - द पॉयझन ऑफ अगाथा ख्रिस्ती या कादंबरीमध्ये एका नर्सनं आठ लोकांची केमिकल देऊन हत्या केल्याचा उल्लेख आहे. ती कादंबरी या नव्या गोष्टीमुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती.
हेही वाचा: Viral Video : थोडीशी दारू प्यायचीय पप्पा...; दारूसाठी लेकरू ढसाढसा रडलं
भारतात आर्सेनिकचा वापर वाढलाय....
आश्चर्याची बाब अशी की, आर्सेनिकचा वापर हा गुन्हेगारी जगतामध्ये वाढताना दिसतो आहे. आर्सेनिक हे मुळ शुद्ध स्वरुपात जेव्हा असते ते काही धोकादायक नसते. मात्र व्हाईट कलरचे आर्सेनिक ऑक्साईड हे जास्त धोकादायक असते. अनेक वर्षांपासून अर्सेनिक हे एक शस्त्र म्हणून वापरले गेले आहे. भारतामध्ये व्हाईट अर्सेनिकची चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा रतनबाई जैननं तिच्याकडे काम करणाऱ्या तीन मुलींचा जीव त्या अर्सेनिकतून घेतला होता. तिला असा संशय होता की, त्या मुलींचे आपल्या नवऱ्याशी अनैतिक संबंध आहेत. त्यानंतर कोर्टानं रतनबाईला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशी देण्यात आलेली पहिली महिला म्हणून रतनबाईचे नाव गुन्हेगारी जगतात नोंदले गेले.
अर्सेनिक हे केसांमध्ये, नखांमध्ये आणि हाडांमध्ये आढळून येते. १९३५ पासून पोलिसांनी अर्सेनिकचा वापर करुन झालेल्या गुन्ह्यांची वेगळी नोंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. १९५३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या अशाच आणखी एका घटनेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. चेंबूर येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासानंतर त्याचा मृत्यु अर्सेनिक देऊन झाल्याचे दिसून आले होते.
हेही वाचा: Video Viral : बिन बुलाये मेहमान! लग्नाच्या समारंभात वळूची एन्ट्री अन्...
अहमदनगरमध्ये देखील घडली होती अशीच घटना....
१९५९ मध्ये अहमदनगर मधील डॉक्टर प्रभाकर हसबनीस यांनी पत्नी पद्माची पैशांसाठी हत्या केल्याचे दिसून आले होते. ९० च्या दशकामध्ये देखील औरंगाबादमध्ये एका डॉक्टरनं पत्नी, मुलांसहित आत्महत्या केल्याचे दिसून आले होते. त्यात त्यानं मीठामध्ये अर्सेनिक मिसळले होते. सध्या फॉरेन्सिक सायन्स हे वेगानं अर्सेनिकचा वापर करुन होणाऱ्या हत्यांच्याबाबत तपास करत असल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांच्या मते, पूर्वी सारखे आता अर्सेनिकला जीवघेणे हत्यार म्हणून वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
हेही वाचा: Viral Video : विवाहीतेने संदूकीत लपवून ठेवला प्रियकर, सासरच्या लोकांनी...
पुण्यातही २००८ मध्ये आदिती शर्मा आणि तिचा प्रियकर प्रवीण खंडेलवाल यांच्या घटनेनं लक्ष वेधून घेतले होते. आदितीनं तिचा एक्स बॉयफ्रेंडची हत्या केली होती. तिला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. आदितीनं प्रसादामध्ये अर्सेनिक मिसळल्याचे तपासातून दिसून आले होते.