Arunachal Pradesh Elections: ना मतदान ना मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये जिंकले भाजपचे 8 उमेदवार!

BJP candidates won: अरुणाचल प्रदेश मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल रोजी होणार आहेत.
BJP
BJP

Arunachal Pradesh Assembly Elections 2024: अरुणाचल प्रदेश मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल रोजी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्याआधीच भारतीय जनता पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आणि अनेकांचे अर्ज रद्द करण्यात आल्याने आठ उमेदवार विजयी होणं औपचारिकता राहिली आहे.

भाजपच्या आठ उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा देखील समावेश आहे. पेमा खांडू हे सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याआधी, पेमा खांडू यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. या जागेवर २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत पेमा खांडू बिनविरोध निवडून आले होते. (Arunachal Pradesh Assembly Elections 2024 Neither voters nor votes 8 BJP candidates won )

BJP
Lok Sabha Election : पत्नीच्या मदतीने संसद प्रवेशाचे स्वप्न; ‘बाहुबली’ पतीऐवजी निवडणूक रिंगणात ; उज्ज्वलकुमार

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी पार पडतील. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात हे मतदान होईल. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभेच्या जागा आहेत, तर दोन लोकसभेच्या जागा आहेत.

अरुणाचल पश्चिम आणि अरुणाचल पूर्व या दोन लोकसभा मतदारसंघासाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. राज्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च पर्यंतच होती. राज्यात विधानसभेसाठीची मतमोजणी २ जून रोजी होईल. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागेल.

BJP
Nashik Lok Sabha Election : विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ कुटुंबात फूट ! झिरवाळ यांनी दिंडोरीत मागितली राष्ट्रवादीची ‘तुतारी’

कोणत्या उमेदवारांचा झालाय विजय?

अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्ता विधानसभेच्या जागेवरुन, एर हेज अप्पा जीरो जागेवरुन, रोइंग जागेवरुन मुच्चू मीठी, सगाली जागेवरुन एर रातू तेची, ईटानगरमधून तेची कासो, ताली जागेवरुन जिक्को ताको, तलिहा जागेवरुन न्यातो डुकोम यांचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार दासंगलू पूल यांनीही हयुलियांग मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्या अंजॉ जिल्ह्याच्या आयरन लेडी म्हणून ओळखल्या जातात. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com