Arvind Kejriwal : '...म्हणून केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई खातायत'; ईडीचा न्यायालयात दावा

Arvind Kejriwal Latest News : शरिरातील साखरेची नियमितपणे तपासणी करावी तसेच डॉक्टरांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशा विनंतीची याचिका केजरीवाल यांनी दाखल केली आहे
Arvind Kejriwal deliberately eating mangoes  sweets enforcement directorate marathi news
Arvind Kejriwal deliberately eating mangoes sweets enforcement directorate marathi news

नवी दिल्ली : मधुमेह वाढला तर वैद्यकीय आधारावर जामीन मिळू शकतो, या उद्देशाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आंबे तसेच मिठाई खात आहेत, असा दावा सक्तवसुली संचलनालयाकडून गुरुवारी विशेष न्यायालयात करण्यात आला.

शरिरातील साखरेची नियमितपणे तपासणी करावी तसेच डॉक्टरांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशा विनंतीची याचिका केजरीवाल यांनी दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी करताना ईडीने वरील दावा केला. शरिरातील साखर वाढली तर जामीन मिळू शकतो, या उद्देशाने केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई खात आहेत. शिवाय साखरेच्या चहाचे सेवन करीत आहेत, असे ईडीच्या वकिलांकडून न्यायालयाला सांगण्यात आले.

Arvind Kejriwal deliberately eating mangoes  sweets enforcement directorate marathi news
MS धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला जाणार? रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य

केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ईडीच्या दाव्याचे खंडन केले. यावर केजरीवाल यांना दिल्या जात असलेल्या आहाराची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला दिले. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना गेल्या महिन्यात अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. विशेष न्यायालयाने त्यांना 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिकडेच दिले होते.

Arvind Kejriwal deliberately eating mangoes  sweets enforcement directorate marathi news
Ajit Pawar: प्रचारसभेत अजित पवारांनी केलं विजय शिवतारेंचं कौतुक म्हणाले, 'विरोधक आणि मित्र कसा असावा...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com