Ajit Pawar: प्रचारसभेत अजित पवारांनी केलं विजय शिवतारेंचं कौतुक म्हणाले, 'विरोधक आणि मित्र कसा असावा...'

Ajit Pawar: राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आज महायुतीचे अनेक उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले जात आहे.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

Ajit Pawar: राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आज महायुतीचे अनेक उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले जात आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारे याच्यांकडे पाहून कळतं म्हणत महायुतीला विजय करण्यास आपल्याला काम करायचं आहे म्हणत मतदारांना साद घातली आहे.

Ajit Pawar
Crime News: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांची ६ वर्षांनी सुटका

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांना एकत्रित घेऊन काम करायचं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना विजय करा, पुणे, शिरूर आणि मावळमधील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. अजून विकास करण्यासाठी आपल्याला केंद्राची मदत हवी आहे.

महायुतीला विजयी करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारे यांच्याकडे पाहून कळतं असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणालेत.

Ajit Pawar
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्... दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "ही गावकी भावकीची निवडणूक नाही. तर ही देशाची निवडणूक आहे, देशात विकास कोण करेल. पंतप्रधान मोदी यांनी तडफदार आक्रमकपणे विकासकामे केली. आता आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबर आणण्यासाठी काम करत आहेत, असे म्हणत देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे".

ही निवडणूक मोदींविरुद्ध राहुल गांधी अशी आहे. उगाच भावकीची निवडणूक केली जाते आहे. ही निवडणूक देश पातळीवरची आहे. अजिबात हलक्या कानाचे राहू नका, बनवाबनवी सुरू आहे, ऐकू नका" असा कानमंत्रही अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

Ajit Pawar
आता किराणा दुकानातही मिळणार सर्दी-खोकल्याची औषधे, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com