स्क्रीनशॉट शेअर केले तर पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही; केजरीवाल भडकले

arvind kejriwal PM Narendra Modi
arvind kejriwal PM Narendra Modisakal

नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या वतीने आज देशभरातील 'आप'च्या लोकप्रतिनिधींचे अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनाला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर अनेक आरोप केले. एवढेच नाही तर अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचे मीडिया सल्लागार हिरेन जोशी यांच्यावर पत्रकार आणि माध्यमांच्या संपादकांना धमकावल्याचा आरोपही केला. (arvind kejriwal news in Marathi)

arvind kejriwal PM Narendra Modi
काँग्रेसमध्ये बंड केलेले आमदार जाणार थेट मोदींच्या भेटीला; सोमवारी घेणार भेट

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात म्हटले की, हिरेन जोशी हे पीएम मोदींच्या कार्यालयात मीडिया सल्लागार म्हणून काम करतात. अनेक मोठ्या वाहिन्यांचे मालक आणि संपादकांनी हिरेन जोशी यांच्याकडून आलेले धमक्यांचे मॅसेज मला दाखवले होते. केजरीवालांना आणि आम आदमी पक्षाला बातम्यांमध्ये स्थान द्याल तर याद राखा. आम आदमी पक्षाला बातम्यांमध्ये दाखवण्याची काहीही गरज नाही, अशा धमक्या देतायत. धमक्या देऊन देश चालवणार का, असा सवालही केजरीवाल यांनी केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला हिरेन जोशीजींना एकच सांगायचे की, तुम्ही पाठवलेले मेसेज आणि धमकीचे स्क्रीनशॉट मी सोशल मीडियावर टाकलेत तर तुम्हाला आणि पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे धमक्या देणे बंद करा.

सीएम केजरीवाल म्हणाले की , भाजप आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे , पण आमचे नेते प्रामाणिक आहेत हे त्यांना माहित नाही. भाजपने आधी सत्येंद्र जैन यांना अटक केली आणि नंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या मागे लागले. सिसोदिया यांच्या घरातून त्यांना काहीही मिळाले नाही. आता ते 5-6 लोकांच्या घरांवर छापे टाकतील आणि नंतर ते सांगतील की त्यांना त्यांच्या साथीदारांकडून सर्व काही मिळाले, असंही केजरीवाल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com