

Arvind Kejriwal's Sheesh Mahal
Esakal
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री असताना ज्या सरकारी निवासस्थानी रहायचे त्यावर करण्यात आलेल्या खर्चावरून अनेकदा टीकेचा धनी ठरले होते. या बंगल्याला शीशमलह असं संबोधून भाजपने केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता हा बंगला दिल्ली सरकारने नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्याचा निर्णय घेतलाय. भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण हा बंगला आहे म्हणूनच तो नागरिकांना दाखवला जाईल असं मंत्री प्रवेश साहिब सिंह यांनी म्हटलंय. पुढील आठवड्यापासून नागरिकांना या निवासस्थानाला भेट देता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.