Arvind Kejriwal: चोरांचा पक्ष ते मंगळसूत्रा पर्यंत... अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

Arvind Kejriwal's 1st Speech After Securing Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 50 दिवसांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते मुख्यमंत्री कार्यालय आणि सचिवालयात जाऊ शकत नाहीत.
Arvind Kejriwal's 1st Speech After Securing Interim Bail in 10 points
Arvind Kejriwal's 1st Speech After Securing Interim Bail in 10 points Sakal

Arvind Kejriwal's 1st Speech After Securing Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 50 दिवसांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते मुख्यमंत्री कार्यालय आणि सचिवालयात जाऊ शकत नाहीत. मात्र त्यांनी आम आदमी पक्षाच्या मुख्य कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका केली.

त्यांनी थेट भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना चोर म्हटले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली असेही ते यावेळी म्हणाले.

अरविंद केजरीवाल पहिल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

  • अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे वर्णन चोर आणि चोरांचा पक्ष असे केले. ते म्हणाले की, भाजपने देशभरातील चोर आणि दरोडेखोरांना पक्षाचा भाग बनवले आहे. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री केले आहे. त्यांची सर्व ईडी-सीबीआय प्रकरणे बंद केली आहेत.

  • केजरीवाल म्हणाले की, भाजपचे एकच मिशन, एक राष्ट्र एक नेता आणि एक हुकूमशहा. भाजप-मोदींचे उद्दिष्ट फक्त आम आदमी पार्टीला संपवण्याचे आहे, पण आम आदमी पार्टी ही एक विचारधारा आहे. केजरीवालांना अटक करू शकता, विचारधारा कशी संपवणार?

Arvind Kejriwal's 1st Speech After Securing Interim Bail in 10 points
Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण
  • मोदी हे हुकूमशहापेक्षा कमी नाहीत. त्यांना लोकशाही संपवायची आहे. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांची राजकीय कारर्कीद संपवली. यावेळी भाजपचे सरकार आल्यास योगी आदित्यनाथ यांना संपवले जाईल. त्यांचे राजकारण संपुष्टात येईल. मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मते मागत आहेत. अमित शहा पंतप्रधान होतील.

  • केजरीवाल म्हणाले की, रात्री वादळ आले, ते केजरीवालांचे वादळ होते. आता आणखी एक वादळ 4 जूनला येणार आहे. मी गेल्या 20 तासात मोठ्या विश्लेषकांशी बोललो आहे. लोकांशीही चर्चा केली. 4 जूननंतर देशात भाजपचे सरकार स्थापन होणार नाही, असे माझे स्वतःचे आकलन आहे. मोदी आणि भाजपचा अंत होत आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, बंगाल, झारखंडमध्ये भाजप संपत आहे.

  • आम आदमी पक्षाला चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदी फक्त माझ्याबद्दल बोलतात. ते ज्यांना भेटतात ते अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीची चर्चा करतात.

  • आपल्याकडे 21 दिवसांचा वेळ असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. मी 24 ते 36 तास काम करेन. मी देशभरातील लोकांमध्ये जाऊन हुकूमशाहीविरोधात प्रचार करेन. भारत देशात 4 जून रोजी आघाडी सरकार स्थापन करणार आहे. आम्ही 220 ते 230 जागा जिंकत आहोत. आम आदमी पार्टीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होईल. मी वचन देतो की मी दिल्लीला पूर्ण राज्य बनवीन.

Arvind Kejriwal's 1st Speech After Securing Interim Bail in 10 points
Uddhav Thackeray : मोदींना महाराष्ट्र दिल्ली पाहू देणार नाही! ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात,आता वानप्रस्थाश्रमात जा
  • मला कोणत्याही पदाचा लोभ नाही, असे केजरीवाल म्हणाले. लोभ असता तर आज मी आयकर विभागाचा संचालक झाला असतो. देशसेवेसाठी आयकर आयुक्त पद सोडले. मला ना मुख्यमंत्री व्हायचे आहे ना पंतप्रधान, मला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे आहे. भाजपने केजरीवाल यांच्याकडून शिकावे भ्रष्टाचाराविरुद्ध कसे लढायचे? भ्रष्टाचार प्रकरणात मी माझ्या नेत्यांना सोडले नाही.

  • भाजप आणि मोदींना लाज वाटली पाहिजे, ते माता-भगिनींच्या मंगळसूत्राचे नाव घेऊन मते मागतात, असे केजरीवाल म्हणाले. निवडणूक आयोगाकडून नोटीस मिळाल्यानंतरही सुधारणा झाली नाही. अशा नेत्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी आज मी तुमचा पाठींबा मागत आहे. लोकांनी मतदान करून भाजपला धडा शिकवावा, हुकूमशहाचा पाडाव करावा.

  • भाजप सरकार विरोधकांना तुरुंगात पाठवत आहे. त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवले. आता त्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तुरुंगात पाठवायचे आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासाठी त्यांनी अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवले. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.

  • येत्या काही दिवसांत ते तेजस्वी यादव, पी विजयन यांसारख्या नेत्यांना तुरुंगात पाठवतील. मी या हुकूमशाहीशी लढणार आहे - मी देशवासियांना विनवणी करतो की तुम्ही देशाला यापासून वाचवा.

(स्टोरीः मनोज साळवे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com