नोटाबंदी केली अन् ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या; ओवैसींची मोदींवर टीका

'मोदी सरकार देशाच्या सुरक्षेशी खेळ खेळत आहे.'
Asaduddin Owaisi And Narendra Modi
Asaduddin Owaisi And Narendra Modiesakal

रांची : सध्या अग्निपथ योजनेविरोधात तरुणांकडून विरोध सुरुच आहे. काँग्रेस पक्षासह विविध पक्षही आंदोलन करित आहेत. दुसरीकडे भरती होणाऱ्या अग्निवीरांसाठी दोन वर्षाने वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच सरकारच्या विविध खात्यांमध्ये १० टक्के आरक्षण सेवानिवृत्तीनंतर अग्निवीरांना नोकरी दिली जाईल, अशी घोषणा केंद्राने केली आहे. (Asaduddin Owaisi Attack On Modi Government Over Agnipath Scheme)

Asaduddin Owaisi And Narendra Modi
'पंकजा मुंडेंना सापत्न वागणूक, फडणवीस अन् पाटील उपहासात्मक बोलून हिणवतात '

मात्र अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) युवकांचा रोष कायम असून त्यांचे आंदोलन सुरुच आहे. यावरुन एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नरेंद्री मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार (Modi Government) देशाच्या सुरक्षेशी खेळ खेळत आहे. चार वर्षांमध्ये कोण काय शिकेल? तुम्ही खोटे बोलत आहात. पंतप्रधानांना सांगतो खेळ खेळू नका. तुम्ही नोटाबंदी केली आणि ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असा घणाघाती टीका आवैसी यांनी मोदी सरकारवर केली.

Asaduddin Owaisi And Narendra Modi
आय लव्ह यू जिंदगी ! असे स्टेट्स ठेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या

तुम्ही रातोरात चुकीच्या पद्धतीने लाॅकडाऊन लागू केले. त्याने लाखो लोकांना त्रास झाला. आज तुम्ही तरुणांबरोबर क्रूरतेने खेळ खेळत आहात, अशी टीका अग्निपथ योजनेवर अससुद्दीन ओवैसी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com