17 सप्टेंबरला 'मुक्ती दिन'ऐवजी 'राष्ट्रीय एकता दिवस' नाव द्या; ओवेसी यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin owaisi,  amit shah

17 सप्टेंबरला 'मुक्ती दिन'ऐवजी 'राष्ट्रीय एकता दिवस' नाव द्या; ओवेसी यांची मागणी

हैद्राबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी दावा केला की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून 'हैदराबाद मुक्ती दिन' ऐवजी 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून १७ सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याची मागणी केली.

हेही वाचा: "काँग्रेस भारतातून नष्ट होतेय अन् जगातून कम्युनिस्ट"; अमित शहांचा हल्लाबोल

केंद्र सरकारने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून घोषित केल्यानंतर काही तासांतच ओवेसी यांनी हा दावा केला. ब्रिटिश शासकांविरुद्ध लढलेले क्रांतिकारक तुर्रेबाज खान आणि मौलवी अलाउद्दीन यांच्या बलिदानाचे स्मरण करून ओवेसी म्हणाले की, हैदराबाद संस्थानात राहणाऱ्या सामान्य हिंदू आणि मुस्लिमांनी लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक भारताचा पुरस्कार केला होता.

ओवेसी पुढं म्हणाले की, विविध संस्थानांचे विलीनीकरण हे केवळ प्रांतांना निरंकुश राज्यकर्त्यांपासून मुक्त करण्यासाठी नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी चळवळीने या प्रदेशांतील लोकांना स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले. त्यामुळे केवळ मुक्ती हा शब्द वापरण्याऐवजी 'राष्ट्रीय एकात्मता दिन' अधिक योग्य ठरेल. केवळ जमिनीचा तुकडा 'मुक्त करणे' म्हणून याकडे पाहिले जाऊ नये, असे ते म्हणाले.

हेही वाचा: UP: बाईकला हात लावला म्हणून दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण; शिक्षक निलंबित

विशेष म्हणजे, केंद्र सरकारने आधीच जाहीर केले की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी "हैदराबाद मुक्ती दिन" एक वर्षाच्या दीर्घ कार्यक्रमासह साजरा करण्यात येईल. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री केजी किशन रेड्डी यांनी तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना 17 सप्टेंबरच्या उत्सवासाठी आमंत्रित करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

Web Title: Asaduddin Owaisi National Unity Day Hyderabad Mukti Diwas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..