ओवैसींनी भाजपवर नव्हे तर काँग्रेसवर साधला निशाणा; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi targets Congress

ओवैसींनी भाजपवर नव्हे तर काँग्रेसवर साधला निशाणा; म्हणाले...

नेत्यांचा सभापतींवर विश्वास नाही. महाराष्ट्रावर काँग्रेसने १५ वर्षे राज्य केले. परंतु, आता तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. तर दिल्लीत ते कुठेच दिसत नाही. त्यांचे लोक सोडून जात आहेत. गुजरातमधील कार्याध्यक्षांचा अनौपचारिक अध्यक्षांवर विश्वास नसल्यामुळे ते निघून गेले, असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. (Asaduddin Owaisi targets Congress)

काँग्रेसच्या (Congress) गुजरात युनिटचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवारी ट्विटरवर काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. ‘आज मी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन’ असे हार्दिक पटेलने (Hardik Patel) लिहिले.

हेही वाचा: संघप्रमुख मोहन भागवत बंगाल दौऱ्यावर; ममता बॅनर्जी पोलिसांना म्हणाल्या...

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की मुस्लिम धार्मिक कार्य करू शकतात. याचा अर्थ आम्ही तिथे वुजू करू शकतो. हा कारंजा आहे. असे झाले तर ताजमहालाचे सर्व कारंजे बंद करा. भाजपला देशाला पुन्हा १९९० च्या दशकात घेऊन जायचे आहे. जेव्हा दंगली घडल्या होत्या, असे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) ज्ञानवापीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

Web Title: Asaduddin Owaisi Targets Congress Mocked Under The Name Of Hardik Patel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Asaduddin OwaisiCongress
go to top