संघप्रमुख मोहन भागवत बंगाल दौऱ्यावर; ममता बॅनर्जी पोलिसांना म्हणाल्या...

Rss President Mohan Bhagwat on a tour of Bengal
Rss President Mohan Bhagwat on a tour of BengalRss President Mohan Bhagwat on a tour of Bengal

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या पश्‍चिम बंगाल दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या काळात कोणतीही दंगल होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. ममता यांनी पोलिसांना सुरक्षा द्यावी आणि प्रशासनाकडून मिठाई आणि फळे पाठवावीत असे सांगितले. आपण पाहुण्यांचे स्वागत करतो असे त्यांना वाटले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. (Rss President Mohan Bhagwat on a tour of Bengal)

संघप्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) १७ ते २० मे या कालावधीत पश्चिम बंगालच्या केशियारी येथे असतील. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मंगळवारी केशियारी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सुरक्षा द्या आणि दंगल होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. प्रशासनाच्या वतीने मिठाई व फळे पाठवा. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात प्रशासकीय बैठक घेत असताना ममता यांनी हे सर्व सांगितले.

Rss President Mohan Bhagwat on a tour of Bengal
ठग सुकेश चंद्रशेखरचे उपोषण; पत्नीसोबत राहू देण्याची करतोय मागणी

मोहन भागवत हे पश्चिम बंगालमधील (Bengal) केशियारी येथे चार दिवसीय शिबिराचे आयोजन करणार आहेत. जिथे ते आरएसएस प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील. हे शिबिर तीन आठवडे चालणार आहे. अलीकडच्या वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारवाया आणि कृतींमुळे बंगालमध्ये भाजपची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

पश्‍चिम बंगालमधील (Bengal) आरएसएसच्या नेत्यांनी ममता बॅनर्जींच्या दंगलखोर वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी भाजपने बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही. मोहत भागवत (Mohan Bhagwat) येथे राहत नसतानाही पश्चिम बंगालमध्ये दंगली होत असल्याचे ते म्हणाले. पोलिस आणि त्यांचे कार्यकर्ते लोकांची हत्या आणि बलात्कार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Rss President Mohan Bhagwat on a tour of Bengal
महाराष्ट्रातील आमदारांना संभाजीराजेंचे खुलं पत्र; म्हणाले...

यावर्षी फेब्रुवारीमध्येही मोहन भागवत यांनी उत्तर बंगालमधील नक्षलबारी येथे चार दिवसीय बैठक घेतली होती. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग हिल्स आणि शेजारील सिक्कीममध्ये युनिट्स स्थापन करण्याची आरएसएसची योजना आहे. बंगालमध्ये आरएसएसच्या सुमारे १,८०० शाखा आहेत आणि त्यापैकी सुमारे ४५० शाखा राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com