esakal | तुरुंगात असलेल्या आसारामला कोरोना, ICU मध्ये उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Asaram Bapu

जोधपूर सेंट्रल जेलमधील डझनभर कैद्यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांना जेलमधील डिस्पेंसरीमध्ये ठेवण्यात आलं होतं.

तुरुंगात असलेल्या आसारामला कोरोना, ICU मध्ये उपचार सुरू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर सेंट्रल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूला बुधवारी (ता.५) रात्री उशिरा महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आलं. आसारामला तुरुंगात कोरोनाची लागण झाली होती. तीन दिवसानंतर अचानक तब्येत बिघडल्यामुळे कारागृह प्रशासनानं रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने आसारामवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आसारामला जोधपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. (Asaram Bapu infected with corona admitted to ICU in Jodhpur)

हेही वाचा: जॉब गेलाय? काळजी नको, कोरोना काळात कमाईचे ५ पर्याय

जोधपूर सेंट्रल जेलमधील डझनभर कैद्यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांना जेलमधील डिस्पेंसरीमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता इतर कैद्यांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. वयस्कर आसारामची तब्येत बिघडल्याने जेलला कोरोना विळखा घातला असल्याची शंका निर्माण झाली आहे.

राजस्थानमध्ये कोरोनाचा कहर

राजस्थानमध्ये बुधवारी १६ हजार ८१५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच दिवसभरात १५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख ९६ हजार ६८३ कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५ हजार २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा: संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?

वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात सापडलेल्या १६ हजार ८१५ रुग्णांमध्ये जयपूरमधील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहेत. जयपूरमध्ये ३ हजार ३०१, उदयपूरमध्ये १४५२, जोधपूरमध्ये १४०१, अलवरमध्ये ९०१, गंगानगरमध्ये ८३६, कोटामध्ये ६७८, बीकानेरमध्ये ६०९, हनुमानगडमध्ये ६०२, सीकरमध्ये ५६१ तर चुरूमध्ये ५२९ रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ हजार २२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.