

प्रशासकीय अधिकारी नोकरी करताना आपल्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ५७ वेळा बदली झालेले आयएएस अशोक खेमका नुकतेच सेवानिवृत्त झाले. यामध्ये ८ वेळा ते एक महिन्यापेक्षा कमी काळ त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत राहिले. अशोक खेमका यांनी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे. निवृत्तीनंतर काय करायचं याचा प्लॅन त्यांनी तयार केलाय.