लॉकडाऊनमध्ये पगारात कपात नव्हे तर पगारवाढ...

वृत्तसंस्था
Friday, 15 May 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात झाल्यानंतर विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे विविध कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आणि कर्मचाऱयांच्या पगारात कपात करण्यात आली. मात्र, एका कंपनीने कर्मचाऱयांच्या पगारात कपात नव्हे तर वाढ केली आहे. एशियन पेंट्स असे या कंपनीचे नाव आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात झाल्यानंतर विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे विविध कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आणि कर्मचाऱयांच्या पगारात कपात करण्यात आली. मात्र, एका कंपनीने कर्मचाऱयांच्या पगारात कपात नव्हे तर वाढ केली आहे. एशियन पेंट्स असे या कंपनीचे नाव आहे.

Video: आधुनिक युगातील 11 वर्षाचा श्रावणबाळ...

कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक व्यवस्था बिघडल्यामुळे विविध कंपन्यांनी कर्मचाऱयांची कपात सुरू केली आहे. काही कंपन्यांनी पगारात काही प्रमाणात कपात केली आहे. पण, एशियन पेंट्सने कर्मचाऱयांचे मनोबल वाढावे म्हणून पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

द ग्रेट खली करतोय गवंडीकाम अन् तळतोय भजी...

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शिंगले यांनी सांगितले की, 'आम्हाला खऱ्या नेतृत्वाचे आदर्श उदाहरण द्यायचे आहे. एक संस्था म्हणून आम्ही आमच्या हितचिंतकांची काळजी घेत आहोत, हे आम्हाला सिद्ध करायचे आहे. कंपनी प्रत्येक कर्मचाऱयाची काळजी घेत आहे. कंपनी कर्मचाऱयांसोबत असून, मी आमच्या बोर्डाला देखील अशा निर्णयांबाबत कळवत असतो. बोर्ड सदस्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. पगार वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. कंपनीने विक्रेत्यांना मदत करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विक्री चॅनेलचा भाग असलेल्या ठेकेदारांच्या खात्यात कंपनीने 40 कोटी रुपये जमा केले आहेत.'

Video: या लहानग्याची काय चूक हो?

दरम्यान, एशियन पेंट्सने केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड-19 फंडामध्ये 35 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोरोनाविरोधातील या लढाईच कंपनीकडून वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asian paints raises pay to boost employees morale